कॅनडामध्ये झालेल्या गोळीबारात 4 जणांचा मृत्यू

टॉरंटो – पूर्व कॅनडामधील फ्रेडेरिक्टन शहरात झालेल्या गोळीबार घटनेत 4 जणांचा मृत्यू झाल्याचे समजते आहे. तसेच अनेक जण जखमी असल्याची माहिती कॅनडा पोलिसांनी ट्विटर मार्फत दिली आहे.

हा गोळीबार अद्यापही चालूच आहे. तसेच या घटनेत मृताची संख्या आणखी वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या भागात अद्यापही गोळीबार चालू असल्याने नागरिकांनी मेन आणि रिंग रोडवरून प्रवास करणे टाळावे अशी माहिती कॅनडाच्या पोलिसांनी ट्विटव्दारे दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)