#हाॅकी_विश्वचषक_स्पर्धा_2018 : कॅनडा-दक्षिण आफ्रिका लढत बरोबरीत

भुवनेश्वर – हाॅकी विश्वचषक स्पर्धेत रविवारी झालेल्या क गटातील दुसऱ्या लढतीत कॅनडा-दक्षिण आफ्रिका लढत 1-1 ने बरोबरीत सुटली आहे. त्यामुळे हाॅकी विश्वचषक स्पर्धेतील दक्षिण आफ्रिकेचे आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. तर कॅनडा संघाच्या उपांत्यपूर्व फेरीच्या आशा अजूनही कायम आहेत.

आजच्या बरोबरीमुळे दोन्ही संघांच्या खात्यात प्रत्येकी 1-1 गुण जमा झाले आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या बिली एलतुलीने 43 व्या मिनिटाला गोल करून संघाला आघाडी मिळवून दिली. मात्र त्यानंतर लगेच कॅनडाच्या स्काॅट टुपरने 45 व्या मिनिटाला पेनल्टी स्ट्रोक्सवर गोल करत कॅनडाला बरोबरी मिळवून दिली. त्यानंतर दोन्हीही संघाला शेवटपर्यंत गोल करण्यात अपयश आल्याने हा सामना बरोबरीत सुटला.

-Ads-


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)