आधुनिक मिडिया क्षेत्राला भरती येणार? (भाग-२)

प्रसार माध्यम व मनोरंजन क्षेत्राअंतर्गत एक क्षेत्र बनतं जे आता चांगल्या अशा परतफेडीच्या दृष्टीनं पाहण्यासाठी गुंतवणूकीसाठी पात्र ठरू शकेल. स्वाभाविकच, या क्षेत्रातील संभाव्य प्रगतीवर गुंतवणूक करण्याचा विचार होऊ शकतो.

आधुनिक मिडिया क्षेत्राला भरती येणार? (भाग-१)

मागील पंधरवड्यात जाहीर झालेल्या निवडणुकीच्या विविध टप्प्यातील तारखा, (११ एप्रिल, १८ एप्रिल, २३ एप्रिल, २९ एप्रिल, ६ मे, १२ मे, १९ मे आणि मतमोजणी २३ मे) सर्वांना या स्मार्ट टीव्हीच्या अति स्मार्ट विश्लेषकांबरोबर पुढील महिना-दीड महिना जखडून ठेवतील यात शंकाच नाही. मग त्याजबरोबरीनं आपल्या हरकतीविना शेकडो कंपन्यांच्या असंख्य जाहिरातींचा नजराणा बहाल केल्याशिवाय या चॅनेल्सवाल्यांचा धंदा कसा होणार ? ते देखील कमवायलाच बसले आहेत ना ! म्हणजे निवडणूक लोकशाहीची, त्याबद्दलची अपडेट्स पाहणार भारतीय नागरिक, ते दाखवणारे विविध चॅनेल्स, त्यासाठी पुरस्कर्ते मात्र अनेक. म्हणजेच जर शेकडो कंपन्या जाहिरातींवर खड्या भावात खर्च करणार, तर चॅनेल्स वाल्यांचं उखळ पांढरं होणारच होणार. असं ऐकलंय की, टीव्ही चॅनल्सच्या तीस सेकंदांच्या जाहिरातींसाठी २५००० रुपयांपासून ते कांही लाखांपर्यंत दर आकारले जात आहेत व येणारा सीझन पाहून त्यात दर घसरण्याची चिन्हे कमीच आहेत. त्यातच अनेक माध्यमांनी (मिडीया टीव्ही चॅनेल्सनी) असा पवित्रा घेतला की ते त्यांचे कांही पॉप्युलर चॅनेल्स ते केबल वा डीटीएच ऑपरेटर्सना त्यांच्या बेसिक प्लॅन्समध्ये उपलब्ध करून देणार नाहीत, म्हणजेच तिकडून देखील प्रीमियम.

जगभरात प्रसारमाध्यम आणि मनोरंजन क्षेत्राचा आधुनिक चेहरा यांमध्ये अलीकडेच मोठा बदल झाला आहे. बातम्या, चित्रपट, संगीत आणि टीव्ही शोमध्ये प्रवेश करणाऱ्या डिजिटल प्रकारानं आता या उद्योगात संपूर्ण नवीन आघाडी उघडली आहे. आपल्याकडे दीर्घकाळच्या गुंतवणूकीची तयारी असल्यास, हे एक वाढीव क्षेत्र आहे ज्याचा काळजीपूर्वक विचार करता येऊ शकतो. बऱ्याचजणांना विश्वास आहे की नवनवीन तंत्रज्ञानामुळं ह्या क्षेत्रास खूप वाव आहे, जसजशी वर्ष जातील तसतसं हे क्षेत्र जोर धरू शकेल.

बरेच गुंतवणूकदार मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रातील कंपन्यांमधील शेअर्सची खरेदी करण्याचा विचार करतील, तर हा एक हटके असा पर्याय ठरू शकतो. या क्षेत्रात खालील प्रकारांद्वारे संधी उपलब्ध होऊ शकतात परंतु त्यासाठी दीर्घ मुदतीचा विचार नव्हें, निश्चय  करणंच सोयीस्कर ठरू शकेल.

* डीटीएच म्हणजे डायरेक्ट टू होम नंतर आता आलेलं डायरेक्ट टू मोबाईल.

* फिल्म इंडस्ट्री, ज्याचं २०२३ सालातील मूल्यांकन हे २२९ अब्ज रुपयांच्या घरात गृहीत धरलं जातंय.

* ऑनलाईन गेमिंग – याबद्दल आपण सर्वचजण जाणतो की ह्या गोष्टीनं कशाप्रकारे कब्जा केला आहे.

* ऑनलाईन स्ट्रीमिंग – सध्या आपण पाहतो की,  जिओ सिनेमा, हॉट स्टार, ऍमेझॉन प्राईम व्हिडीओ व नेटफ्लिक्स इत्यादी कंपन्या आपल्या आवडत्या सिरियल्स व सिनेमे अगदी माफक स्वरूपात मोबाईलवर पाहण्यासाठी उपलब्ध करून देत आहेत. विचार करा, मल्टिप्लेक्सला जाऊन ३००-४०० रुपयांचं तिकीट काढून ती मूव्ही पाहणं किफायतशीर का ९९ रुपयांत घरबसल्या हव्या त्या वेळी अगदी आपल्या सोयीनं रिवाईंड, फॉरवर्ड, पॉज करत पाहणं सोपं ?

* व्हर्च्युअल रिऍलिटी – आगामी वर्षांत बरेच लोक विश्वास ठेवतील की आभासी वास्तविकता म्हणजेच व्हर्च्युअल रिऍलिटी (व्हीआर) आहे. गेमिंगमध्ये वापरल्या जाणाऱ्या मनोरंजनामध्ये, टीव्ही आणि चित्रपट कसे पाहिले जातात याबद्दल व्हीआरने बऱ्याच काळापासून चर्चा मांडली आहे. त्यामुळंच प्रसार माध्यम व मनोरंजन क्षेत्राअंतर्गत एक क्षेत्र बनतं जे आता चांगल्या अशा परतफेडीच्या दृष्टीनं पाहण्यासाठी गुंतवणूकीसाठी पात्र ठरू शकेल. स्वाभाविकच, वरील क्षेत्रातील संभाव्य प्रगतीवर गुंतवणूक करण्याचा विचार करणे हा केवळ सल्ला आहे. वास्तविक  अशा आभासी क्षेत्रात गुंतवणूक करण्याआधी आपण भानावर राहून आपलं स्वत:चं संशोधन आणि योग्य परिश्रम करणं आवश्यकच आहे..

या क्षेत्रातील गुंतवणूकीसाठी कांही कंपन्या – झी टेली, टीव्ही१८, सन टीव्ही, इरॉस, आयनॉक्स

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)