झोपेचे सोंग घेणाऱ्यांना उठवता येत नाही!

मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

मुंबई – राज्यात कर्जमाफीसाठी 49 लाख 50 हजार शेतकऱ्यांची नोंद झाली असून आतापर्यंत 21 हजार कोटींची कर्जमाफी देण्यात आली आहे. पण विरोधकांनी या मुद्यावर केवळ राजकारणच केले आहे. झोपलेल्याला उठविता येते पण झोपेचे सोंग घेणाऱ्यांना उठविता येत नाही, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लगावला.
वर्षा निवासस्थांनी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळ, कर्जमाफी, पीक विमा आदी मुद्यांवर मुख्यमंत्र्यांनी भाष्य केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कर्जमाफी, दुष्काळावरून राजकारण करणाऱ्या विरोधकांनाही त्यांनी फटकारले. दुष्काळी भागात कोणत्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत त्याचा मी प्रत्यक्ष जाउन आढावा घेणार आहे. त्याला सुरूवात देखील केली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयाने फटाके वाजविण्याच्या वेळेवर निर्बंध आणले आहेत. त्याबददल विचारले असता, बिनआवाजाचे फटाके वाजविण्यावर निर्बंध नाहीत. ते कधीही वाजविता येतील असे मुख्यमंत्री म्हणाले.

अवनीच्या हत्येने मुख्यमंत्री हळहळले
यवतमाळमधील टी 1 वाघिणीला मारण्याचा निर्णय घ्यावा लागणे, हे दुःखदच आहे. मात्र नाईलाजाने ही कृती करावी लागली. पण ही प्रक्रिया पार पडताना त्यात कोणत्या त्रुटी तर राहिल्या नाहीत ना याची चौकशी करण्यात येईल असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. केंद्रिय मंत्री मनेका गांधी या प्राणीप्रेमी आहेत. त्या अनेक वर्षांपासून प्राणीरक्षणाचे कार्य करत आहेत. मला देखील प्राण्यांच्या अनेक समस्यांबददल त्या नेहमीच फोन करत असतात. त्यांची या विषयाबाबतची भावना मी समजू शकतो असेही ते म्हणाले.

दिवाळीचा फराळ खूप आवडतो…
दिवाळीचा फराळ मला खूप आवडतो. प्रत्येक दिवाळीत मी पाच किलोने वजन तरी वाढवायचो. पण आता दिवाळीचा फराळ “लपून’ खातो. फटाके लहानपणी खूप फोडायचो. पण जसे वय वाढत गेले तसे फटाके कमी होत होत शेवटी बंद केले. आता फारतर मुलीसोबत एखाद दुसरा फुलबाजा उडवतो, असेही मुख्यमंत्र्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)