जाणून घ्या ‘कापुरा’चे औषधी गुणधर्म…

सुजाता गानू 

कापराला पूजेत अग्रस्थान दिले आहे कारण तो जाळल्याने हवा शुद्ध होते. कापूर पुष्कळ दिवसापर्यंत उघडा राहिला असता उडून जातो, सबब डब्यात भरून ठेवला पाहिजे. हा खडीसाखरेच्या खड्यासारख्या पांढरा व पारदर्शक असतो. ह्याचा वास उग्र असून चव कडू व थंड असतो. कापूर हा लवकर जळतो. याचे अंगी हवा शुद्ध करण्याचा मुख्य गुण आहे.कापराचे अनेक औषधी उपयोग आहेत.
तापात – ताप आला असता घाम येण्यासाठी अर्धा ग्रॅम कापूर विड्याच्या पानातून खावा. अर्ध्या तासाच्या आत घाम येऊन ताप कमी होतो.कापूर नुसता तोंडात धरला असता ताप कमी होऊ लागतो.
जंतुनाशक – कापूर हा जंतुनाशक आहे.
डोके दुखत असल्यास – तूप किंवा लोणी यामधून कापूर शरीराच्या कोणत्याही भागास काही वेळ चोळल्यास तो भाग बधीर होतो. म्हणून डोके दुखत असल्यास तुपातून कापूर चोळावा. डोके दुखत नाही.
पोट दुखत असल्यास – पोट दुखत असल्यास साखरेतून 1/2 ग्रॅम कापूर खावा, पोट दुखण्याचे थांबते. गोवर, देवी, संग्रहणी, अतिसार, संधिवात, नवज्वरात वापरता येतो. कापूर जंतुनाशक असल्याने तो अनेक रोगांवर उपयुक्‍त आणि गुणकारी औषध ठरते. त्यामुळे गोवर, देवी, संग्रहणी, अतिसार, संधिवात, नवज्वर व तापात अंगावर बारीक बारीक पुटकुळ्या उठतात, त्या तापात व दमा वगैरे रोगांत कापूर दिल्याने रोग्यास आराम वाटतो.
स्त्रियांच्या मासिक पाळीच्या विकारात – स्त्रियांच्या आर्तव संबंधी सर्व रोगात केळ्यातून कापूर देतात. त्यामूळे आर्तवाचे रोग बरे होतात.
मेंदूचे विकारांत – मेंदूच्या विकारांत कापराचा उपयोग होतो. ह्याची थोडी थोडी मात्रा रोज द्यावी.
निद्रानाशावर – कापूर खाल्ल्याने नाडीचे ठोके जलद पडू लागतात. झोप येण्याकरिता कापराची छोटी वडी खावी. निद्रानाश बरा होतो व ती व्यक्‍ती स्वस्थ निजते.
सर्दीवर – सर्दी झाली असता कापराची पूड नाकपुडीत तपकिरीप्रमाणे ओढावी त्यामुळे सर्दी कमी होऊन डोकेही दुखण्याचे थांबते.
छातीचे रोग बरे करण्यास – कापराची वाफ जर श्‍वासोच्छ्वासाबरोबर आत ओढली तर छातीचे रोग बरे होतात.
स्वप्नदोष नाहीसा करते – कापूराची छोटी वडी तोंडात धरून झोपले असता स्वप्नदोष जातो. स्वप्नावस्था थोडेच दिवसात बंद होते. गर्भाशय दुखत असल्यास बेंबीखाली दोन बोटे कापूर व हिंग प्रत्येकी पाव ग्रॅम ठेवला असता रोग्यास आराम वाटून गर्भाशय दुखायचे थांबते.
संधिवातावर – कापराचे तेल, खोबरेल तेलात किंवा तिळाचे तेलात करतात. कापराच्या चौपट यापैकी कोणतेही एक तेल घेऊन त्यात कापूर विरघळवावा. हे तयार झालेले तेल संधिवातामुळे दुखत असलेले सांधे, सांधे सुजले असता शरीरातील गाठी वाढल्या असता लावावे.
जखमेवर – जखम झाली असता कापराचे तेल लावावे. कापराचे तेल हे खोबरेल तेलात अथवा तीळाच्या तेलात बनवावे. शरीरात इतरत्र कुठेही दुखत असेल तर कापूर तीळाचे तेल दुखऱ्या भागावर लावावे. वेदना कमी होतात.
हृदय धडधडत असेल तर – कापूर व हिंगचूर्ण समप्रमाणात घेऊन एकत्र करून त्याची गोळी तयार करावी व कोणत्याही कारणाने जर हृदय धडधडू लागले तर कापूर व हिंग याची गोळी घ्यावी. हृदयाचे धडधडणे तात्काळ थांबते.
मूत्रविकारात – लघवी करते वेळी तिडीक मारत असेल तर, त्यावर कापूर अफू यांची गोळी दिली असता तिडिक थांबते.तसेच इतर मूत्र विकारारुवर कापूर गूणकारी आहे. बाळंतपणापूर्वी किंवा नंतर आकडी व आचकेवर, बाळंत होण्याच्या अगोदर किंवा बाळंत झाल्यानंतर, आचके किंवा आकडी येत असल्यास कापूर पाव ग्रॅम व कस्तुरी यांचे मिश्रण द्यावे. कापूर 250 मिलि ग्रॅम व कस्तुरी 100 ग्रॅम विड्याच्या पानांतून खावी.
शय्याव्रणावर – शय्याव्रण न होण्याकरिता कापूर व कात यांचे मिश्रण एकत्र करून ते रोज सकाळ संध्याकाळ त्या जागेस लावावे.
नेत्रविकारावर – डोळ्याची आग होत असल्यास अगर जागरणाने डोळे दुखत असल्यास कापराची पूड डोळ्यात घालावी. डोळ्यांची आग कमी होते. कापूर पुष्कळ दिवसापर्यंत उघडा राहिला असता उडून जातो, सबब डब्यात भरून ठेविला पाहिजे. हा खडीसाखरेच्या खड्यासारख्या पांढरा व पारदर्शक असतो. ह्याचा वास उग्र असून चव कडू व थंड असतो. कापूर हा लवकर जळतो याचे अंगी हवा शुद्ध करण्याचा मुख्य गुण आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)