राजस्थानात प्रचाराच्या तोफा थंडावल्या; शुक्रवारी निवडणूका

जयपूर : राजस्थानमध्ये ७ डिसेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठीच्या प्रचाराची आज सायंकाळी ५ वाजता सांगता झाली. सत्ताधारी भाजपा आणि प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसने राजस्थान निवडणुकांच्या प्रचारासाठी आपली सर्व ताकद पणाला लावल्याचे चित्र राजस्थानात पाहायला मिळाले.

राजस्थान निवडणुकांमध्ये १९९ जागांसाठी २२७४ उमेदवार रिंगणात उतरले असून ७ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजल्यापासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान घेतले जाणार असल्याची माहिती राजस्थानचे मुख्य निवडणूक अधिकारी आनंद कुमार यांनी दिली आहे.

भाजपा शासित राजस्थानातील निवडणुकांसाठी भाजपा आणि काँग्रेसने मुख्यतः शेतकरी आणि भ्रष्टाचार या दोन प्रमुख मुद्द्यांवर प्रचार केला असला तरी राजस्थानातील ४.७ करोड मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

भाजपातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, गृह मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह विद्यमान मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी जोरदार प्रचार केला आहे. दुसरीकडे काँग्रेसकडून देखील प्रचारामध्ये कोणतीही कसर सोडली गेली नसून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सचिन पायलट आणि अशोक गेहलोत यांनी प्रचाराची धुरा व्यवस्थित संभाळली आहे.

बहुजन समाज पार्टीच्या सुप्रीमो मायावती यांनी देखील राजस्थानात प्रचार सभा घेतल्या आहेत. बहुजन समाज पार्टीचा अलवार रामघर मतदार संघातील उमेदवार मृत्यू पावल्याने येथील निवडणूका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)