#INDvAUS – ‘रण’संग्रामाला आजपासून सुरूवात

-विश्‍वचषकापुर्वी अखेरची टी-20 मालिका
-अंतिम संघ निवडीची व्यवस्थापनासमोर कसोटी
-रोहित शर्माला विश्रांती देण्याची शक्‍यता
-लोकेश राहुलला सलामीला संधी मिळणार?

विशाखापट्टणम – ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या भारत दौऱ्यावर असून या दौऱ्यात त्यांचा संघ दोन टी-20 आणि पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळनार आहे.

इंग्लंड येथे होणाऱ्या एकदिवसीय विश्‍वचषक स्पर्धेपुर्वी भारतीय संघाची ही अखेरची टी-20 आणि एकदिवसीय मालिका आहे. त्यातील टी-20 मालिकेतील पहिला टी-20 सामना आजपासून विशाखापट्टणम येथील मैदानावर होणार असून विश्‍वचषकाच्या दृष्टीने संघ निवड करताना व्यवस्थापनाची आज कसोटी लागण्याची शक्‍यता आहे.

स्थळ – विशाखापट्टणम
वेळ – सायं 7 वा.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विश्‍वचषक स्पर्धेच्या दृष्टीने भारतीय संघातील सर्व खेळाडू जवळ पास निश्‍चीत करण्यात आले असले तरी संघात दोन खेळाडूंची निवड करणे अद्याप बाकी असल्याकारणाने आजच्या सामन्यात कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री कोणत्या खेळाडूंना अंतिम संघात स्थान देतात हे पहाणे औत्सुक्‍याचे असणार आहे. त्यातच बऱ्याच कालावधी पासून फॉर्ममध्ये नसलेल्या लोकेश राहुलकडे पर्यायी सलामीवीर म्हणुन पाहिले जात आहे.

तर, पर्यायी यष्टीरक्षक म्हणुन दिनेश कार्तिक आणि ऋषभ पंतयांच्याकडे पाहिले जात आहे. मात्र, आजच्या सामन्यात ऋषभ पंत अथवा दिनेश कार्तिक या दोघांपैकी एकाच खेळाडूला संधी मिळू शकते. तर, आजच्या सामन्यात लोकेश राहुलला सलामीला खेलण्याची संधी मिळावी या करिता रोहित शर्मा अथवा शिखर धवन या दोघांपैकी एकाला विश्रांती दिली जाऊ शकते.

विश्‍वचषक स्पर्धेपुर्वी लोकेश राहुल आणि ऋषभ पंत यांच्या कडे संघ व्यवस्थापनाला खुश करण्याची ही अखेरची संधी असून त्यांना आजच्या सामन्यात संधी मिळण्याची जास्त शक्‍यता असून जर त्यांना आज संधी मिळाली तर ऋषभ पंतला तिसऱ्या अथवा चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस पाठवले जाऊ शकते. जेणे करुण विश्‍वचषकात त्याला संधी मिलाल्यास मधल्या फळीतील फलंदाजी अधिक बळकट होण्याच्या दृष्टीने त्याची कामगिरी तपासता येऊ शकेल.

तर, दुसऱ्या बाजुला दिनेश कार्तिकला एकदिवसीय मालिकेतून वगळले असल्याकारणाने विश्‍वचषकासाठीच्या अंतिम संघात स्थान मिळवण्याच्या दृष्टीने ही टी-20 मालिका त्याच्या साठी अखेरची संधी असणार आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात त्याला देखील संघात स्थान दिले जाण्याची शक्‍यता आहे.

तर, तिसरा सलामीवीर म्हणुन लोकेश राहुलला पाहिले जात असल्याने आजच्या सामन्यात त्याला सलामीला पाठविण्यासाठी दोन्ही सलामीवीरांपैकी एका सलामीवीराला आज विश्रांती देण्याची शक्‍यता आहे. तर, मधल्या फळीतील नियमीत अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या पाठीच्या दुखापतीने त्रस्त असल्याने त्याच्या जागी संधी मिलालेल्या विजय शंकरला आपल्या कामगिरीतून प्रभावीत करण्याची ही मोठी संधी असून शंकर हार्दिकला पर्याय म्हणुन अंतिम संघात स्थान मिळवण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे.

तसेच कर्णधार विराट कोहलीही या मालिकेतून भारतीय संघात पुनरागमन करणार आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत त्याला विश्रांती देण्यात आली होती. तर, विर्दभ संघाकडून रणजी करंडक स्पर्धेत दमदार कामगिरी करणाऱ्या उमेश यादवचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे.

या मालिकेतील त्याच्या कामगिरीच्या आधारावर विश्‍वचषक संघात चौथा जलदगती गोलंदाज म्हणून त्याचा विचार केला जाऊ शकतो. त्यामुळे आजच्या सामन्यात त्याला संधी मिळण्याची जास्त शक्‍यता आहे. तसेच नवोदित फिरकी गोलंदाज मयंक मार्कंडे आजच्या सामन्यातून भारतीय संघाकडून पदार्पण करू शकतो.

प्रतिस्पर्धी संघ –

भारत – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, लोकेश राहुल, शिखर धवन, ऋषभ पंत, महेंद्रसिंग धोनी, दिनेश कार्तिक, विजय शंकर, कृणाल पांड्या, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल, उमेश यादव, सिद्धार्थ कौल, मयांक मार्कंडे.

ऑस्ट्रेलिया – ऍरोन फिंच (कर्णधार), डार्सी शॉर्ट, पॅट कमिन्स, ऍलेक्‍स कॅरी, जेसन बेहेरेनडॉर्फ, नॅथन कुल्टर-नाईल, पिटर हॅण्डस्कोम्ब, उस्मान ख्वाजा, नॅथन लायन, ग्लेन मॅक्‍सवेल, ज्येह रिचर्डसन, केन रिचर्डसन, मार्कस स्टोइनिस, ऍश्‍टॉन टर्नर, ऍडम झम्पा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)