नोटबंदीमुळे घरांच्या किंमती स्वस्त झाल्या : मोदी

सुरत : नोटबंदीच्या निर्णयामुळे घरांच्या किंमती स्वस्त झाल्या, त्यामुळे होतकरू युवकांचे घरांचे स्वप्न साकार झाले असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. आपण गेल्या पाच वर्षात जितके काम या देशात केले आहे तितके काम करण्यास मागील सरकारला पंचवीस वर्षे लागली असती असेही त्यांनी म्हटले आहे.

सूरत विमानतळाच्या विस्तारीकरणाच्या कामाचा पायाभरणी समारंभ आज मोदींच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की नोटबंदीच्या निर्णयाचा काय लाभ झाला असा सवाल मला नेहमी केला जातो. हा प्रश्‍न तुम्ही देशातील युवकांना विचारा ते आज घरांच्या किंमती कमी झाल्यामुळे सहज घरे विकत घेऊ शकतात हा त्यांना झालेला मोठा लाभ आहे. यापुर्वी काळे धन देशातील बांधकाम उद्योगात गुंतवले जायचे त्यामुळे बांधकाम व्यवसाय महागडा बनला होता व त्यातून घरेही महागली होती पण काळ्यापैशाला लगाम घातला गेल्याने देशातील घरे स्वस्त झाली असे ते म्हणाले. रेरा कायद्यामुळे बांधकाम व्यवसायातील गैरप्रकारांनाही आळा बसला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

देशातील सर्वसामान्य नागरीकांना विमान सेवेचा लाभ घेता यावा यासाठी सरकारने उडान योजना राबवली त्याचाही लोकांना चांगला लाभ झाला आणि अनेक ठिकाणी छोटी केंद्रेही विमान सेवेने जोडली गेली असे ते म्हणाले. गेल्या साडे चार वर्षांच्या काळात आपल्या सरकारने देशात एक कोटी 30 लाख घरे बांधली पण युुपीए सरकारच्या काळात केवळ 25 लाख घरे बांधली गेली असेही त्यांनी निदर्शनाला आणून दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)