उत्तर कॅलिफोनिर्यातील वणवा अखेर आटोक्‍यात 

लॉस एंजल्स: अमेरिकेतील उत्तर कॅलिफोनिर्या प्रांतातील एका जंगलाला लागलेला आगीचा वणवा अखेर आटोक्‍यात आणण्यात तेथील यंत्रणांना यश आले आहे. गेली दोन आठवडे हा वणवा धगधगत होता त्यात हजारो घरे जळून खाक झाली असून शेकडो लोकांचा त्यात बळी गेला आहे. तथापी मृतांचा अधिकृत आकडा आत्ता पर्यंत 85 इतका दाखवण्यात येत असून अजून 249 लोकांचा नेमका ठावठिकाणा समजलेला नाही.

वणव्याने जंगल भागात असलेल्या अनेक गावांना वेढले होते. तेथील घरांची अक्षरश: राखरांगोळी झाली आहे. 8 नोव्हेंबरला ही आग लागली नंतर ती 240 चौरस मैल अंतराच्या परिसरातील जंगलात पसरली. त्यात त्या भागातील जवळपास सारी वनसंपत्ती नष्ट झाली आहे. या शतकातील ही सर्वात मोठी व भीषण आग होती. आगीत एकूण 19 हजार घरे नष्ट झाली आहेत असा प्राथमिक अंदाज आहे. ही आग विझवणे केवळ अशक्‍य होते व मानवी प्रयत्नांना तेथे मर्यादा होत्या. परंतु त्या प्रांतात आलेल्या पावसामुळे आणि या ऋुतुतील पहिल्या बर्फवृष्टीमुळे आग आटोक्‍यात येऊ शकली आहे. आगीच्या घटनेनंतर त्या भागातील एकूण अडीच लाख लोक तेथून स्थलांतरीत झाले असून त्यांचे पुन्हा त्यांच्या मूळ जागी पुनर्वसन करणे हे एक मोठे दिव्य काम आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)