राफेलवरील कॅगचा अहवाल अजून तयार व्हायचाय !

जानेवारी अखेर पर्यंत तयार होणार अहवाल

नवी दिल्ली: राफेल प्रकरणात सरकारने ज्या कॅग अहवालाचा दाखला सर्वोच्च न्यायालयात सादर केल्याचे सांगितले जात आहे तो अहवालच अजून तयार व्हायचा आहे असे स्पष्ट झाले आहे. हा अहवाल जानेवारी अखेर पर्यंत तयार होईल आणि तो संसदेला सादर केला जाईल अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली असल्याचे एका संकेत स्थळावर नमूद करण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कोणत्याही मंत्रालयाच्या व्यवहाराबद्दल कॅगचा अहवाल तयार होण्यापुर्वी कॅगच्या अधिकाऱ्यांची त्या संबंधीत मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा होणे नियमानुसार बंधनकारक आहे. त्याला एक्‍झिट कॉन्फरन्स असे म्हणतात. राफेल विषयाबाबत तशी एक्‍झिट कॉन्फरन्सच अजून झालेली नाही त्यामुळे हा रिपोर्ट तयार झाला असण्याची सुतराम शक्‍यता नाही असेही आता स्पष्ट झाले आहे. राफेल प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात जो निकाल आला आहे त्या निकालपत्रात सरकारकडे कॅगचा अहवाल आला आहे आणि संसदेच्या सार्वजनिक लेखा समितीने तो तपासला आहे अशी टिपण्णी करण्यात आली आहे. मुळात राफेल वरील कॅगचा अहवालच अजून तयार झालेला नाही तर सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालपत्रात ही टिपण्णी कशाच्या आधारावर केली आहे असा महत्वाचा प्रश्‍न आता या निमीत्ताने उपस्थित करण्यात येत आहे. हाच मुद्दा कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काल आपल्या पत्रकार परिषदेत उपस्थित केला होता.

कॅगच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कॅग कडून राफेलच्या संबंधात स्वतंत्र अहवाल दिला जाण्याची शक्‍यता नाही. संरक्षण विषयक अन्य जे खरेदी व्यवहार झाले आहेत, त्याला जोडूनच राफेल व्यवहारावरील महालेखापालांचा अहवाल सादर केला जाईल आणि त्याचे निष्कर्ष समरीच्या च्या स्वरूपात या एकत्रित अहवालाच्या शेवटी जोडलेले असतील अशी माहिती उपलब्ध होत आहे. सरकारने सर्वोच्च न्यायालयाची या प्रकरणात दिशाभुल करून त्यांना खोटी माहिती दिल्याचा कॉंग्रेसचा आरोप आहे. हा अहवाल मिळाला असेल तर तो कुठे आहे ते दाखवा असे जाहीर आव्हानही कॉंग्रेसने त्यांना दिले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)