केबल खोदाईन केला घात ?

पुणे: खडकवासला कालव्याला गुरूवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास दांडेकर पूलाजवळ भगदाड पडल्याने परिसरातील झोपड्यात पाणी शिरले. लाखो लीटर पाणी प्रचंड वेगाने झोपड्यांमध्ये घुसल्याने अनेक लोकांना बाहेर पडणेही मुश्‍किल झाले. दरम्यान, नागरिकांनी प्रशासनावर तीव्र रोष व्यक्त केला आहे.
ज्या ठिकाणी कळवा फुटला आहे त्या ठिकाणाची पाहणी केला असता ही धक्कादायक बाब समोर येते. ज्या ठिकाणी कालव्याला भगदाड पडले आहे . त्या ठिकाणी कालव्या मातीच्या भिंतीमध्ये तब्बल 6 केबल टाकण्यात आल्या आहेत त्यात 2 केबल खासगी कंपन्यांच्या असून काही केबल महावितरणच्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या केबल कालव्याची भिंत खोदून टाकण्यात आल्याचे दिसत असून कालव्याच्या पाण्यापासून अवघ्या तीन ते पाच फुटावर ही केबल आहे. त्यामुळे ही केबल खोदताना कालव्याची भिंत खोदल्याने त्याचा परिणाम म्हणून ही घटना घडली असल्याचे स्थानिक नागरिक तसेच नगरसेवकांचे मत आहे

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)