विविधा : सी. रामचंद्र

-माधव विव्दांस

वर्ष 1950 ते 1970 च्या कालावधीत रुपेरी पाड्यावर आपल्या संगीताने अक्षरशः धुमाकूळ घालणारे सी. रामचंद्र यांचे आज पुण्यस्मरण (निधन 5 जानेवारी 1982). त्यांचा जन्म 12 जानेवारी 1918 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा येथे झाला झाला.त्यांचे मुळगाव नगरजवळील चितळी म्हणून चितळकर हे आडनाव लागले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

12 जानेवारी 1919 रोजी त्यांच्या जन्मशताब्दीचा समारोप होत आहे. प्रथम नागपूरच्या शंकरराव सप्रे यांच्या मार्गदर्शनाखाली वसंतराव देशपांडे यांच्याबरोबर ते संगीत शिकले. नंतर पुणे येथे विनायकबुवा पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी गंधर्व महाविद्यालया मधे संगीत शिकले. सी.रामचंद्र यांना खरे तर अभिनयाची आवड होती, त्यांनी नागपूर येथे नाटकात काम करून वाहवा मिळवली होती.

चित्रपटात काम मिळविण्यासाठी ते मुंबईला गेले. सहकलाकार म्हणून ते काम करू लागले. पण म्हणावे तसे यश मिळत नव्हते. अखेर ते निर्माते सोहराब मोदींना भेटले. मोदींनी चितळकरांना संगीत क्षेत्रात जाणेचा सल्ला दिला. मोदींनी चितळकरांना मीरसाहेब नावाच्या त्याकाळच्या सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शकाकडे पाठवले. मीरसाहेबांना त्यांच्याकडे असलेल्या संगीतातील माहितीचा उपयोग होऊ लागला. मिनर्व्हा मुव्हिटोनच्या हबीबखान यांच्या समूहात ते सामील झाले. ते तिथे

हार्मोनियम प्लेअर म्हणून काम करू लागले.दरम्यान “वनमोहिनी’ या तामिळी चित्रपटासाठी संगीत देण्याची संधी मिळाली. वर्ष 1942 मधे “सुखी जीवन’ या हिंदी चित्रपटाला संगीत देऊन त्यांनी आपली ओळख निर्माण केली. सिनेदिग्दर्शक जयंत देसाई ह्यांच्या सूचनेवरुन “सी. रामचंद्र’हे संक्षिप्त नाव त्यांनी धारण केले. आपल्या निकटवर्तीयांत ते “अण्णा’म्हणून ओळखले जाऊ लागले. मुंबईच्या हॉटेलमधे वाजवले जाणारे पाश्‍चात्य संगीत ऐकून त्यांना या उडत्या चाली हिंदी चित्रपटात आणण्याची कल्पना सुचली.

मग “इना मिना डिका’सारखी गीते सिनेमात आली. कवी प्रदीपजी यांनी त्यांना शशधर मुखर्जी ह्यांच्या “फिल्मिस्तान’ मध्ये आणले. फिल्मिस्तानच्या “शहनाई’ या चित्रपटाच्या संगीतामुळे ते संगीतकारांच्या वरच्या श्रेणीमधे गणले जाऊ लागले. मा.भगवान ह्यांच्या “अलबेला’मधील “भोली सूरत दिलके खोटे’, “शोला जो भडके’, “शाम ढले खिडकी तले’, “मेरे दिल की घडी करे टिक टिक’, “ओ बेटाजी ओ बाबूजी’ ही गाणी अतिशय गाजली.

‘अनारकली’ चित्रपटातील “ये जिंदगी उसीकी है’ हे त्यातले लता मंगेशकर यांनी गायिलेले गीत अजरामर झाले. “जाग दर्दे इष्क जाग’, “जिंदगी प्यार की दो चार घडी होती है’ (अनारकली), “आधा है चंद्रमा रात आधी’ (नवरंग), “देख तेरे संसार की हालत क्‍या हो गई भगवान’ (नास्तिक), “कैसे आऊँ जमुना के तीर’ (देवता), “कितना हसीन है मौसम’ (आझाद) अशी अनेक गाणी त्यांनी दिली. त्यांची यादी देण्यासाठी जागा पुरणार नाही.

या महान संगीतकारास श्रद्धांजली


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)