‘बीजेडी’कडून लोकसभा उमेदवारांची आणखीन एक यादी जाहीर; ‘पुरी’त मिश्रा विरुद्ध पात्रा लढत रंगणार

पुरी : बीजू जनता दलातर्फे आज आगामी लोकसभा निवडणुकांसाठी आणखीन नऊ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून यामध्ये पुरीतून तीन वेळा लोकसभेची निवडणूक जींकलेल्या पिनाकी मिश्रा यांचा देखील समावेश करण्यात आला आहे.

आपल्या आक्रमक वक्तृत्वासाठी प्रसिद्ध असलेल्या संबित पात्रा यांना याआधीच भाजपकडून आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये ओडिशातील पुरी येथून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. आता बीजू जनता दलातर्फे पुरी येथून लोकसभेची निवडणूक पिनाकी मिश्रा हे लढविणार असल्याचे स्पष्ट झाल्याने संबित पात्रा यांना पुरीच्या जनतेने तीनवेळा संसदेत पाठविलेल्या पिनाकी मिश्रा यांच्यासोबत सामना करावा लागणार आहे. सध्या बिजू जनता दलामध्ये असणारे पिनाकी मिश्रा हे पुरी मतदारसंघातून १९९६मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. यानंतर २००९ व २०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये मिश्रांनी बिजू जनता दलातर्फे निवडणूक लढवत सलग दोनदा जनतेचा कौल मिळवला आहे.

संबित पात्रा यांना भाजपने विद्यमान खासदार पिनाकी मिश्रांच्या विरोधात उतरवले असले तरी भाजपला या मतदारसंघामधून आजतागायत एकदाही विजय मिळवता आलेला नाहीये. २०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये देशभरामध्ये मोदी लाटेच्या माध्यमातून भाजपला मोठे जनमत मिळाल्याचे दिसले असले तरी मात्र पुरी मतदारसंघामध्ये मोदी लाटेचा विशेष प्रभाव पाहायला मिळाला नाही. या मतदारसंघातून भाजपचे उमेदवार अशोक साहू हे तिसऱ्या स्थानावर राहिले तर काँग्रेसच्या सुचरिता मोहंती यांना दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये बिजू जनता दलातर्फे आता पिनाकी मिश्रांनाच संधी देण्यात आली असल्याने संबित पात्रा ‘पुरी’तून तीन वेळा खासदार म्हणून निवडून आलेल्या पिनाकी मिश्रांना टक्कर देण्यात कितपत यशस्वी ठरतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

https://twitter.com/ANI/status/1110888507793260545

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)