वाहतूकीचे नियम मोडून अनेक दिग्गजांनी दंड थकविला?

मुंबई- मुंबईत वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे दंड न भरणाऱ्यांच्या यादीत मनसे प्रमुख राज ठाकरे, युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, परिवहन मंत्री दिवाकर रावते, अभिनेता सलमान खान यांच्यासह अनेक दिग्गजांची नावे आहेत. आपल्याला या दंडाबाबत काहीही माहित नसून वाहनचालकाने वाहतूक नियम मोडले, असे स्पष्टीकरण मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिले आहे.

नो एन्ट्रीमध्ये वाहन नेणे, झेब्रा क्रॉसिंगवर वाहन उभे करणे, सिग्नल तोडणे अशा गुन्ह्यांसाठी राज्यभरात दंड आकारला जातो. मुंबईत हा दंड ट्रॅफिक पोलीस वसूल करत नाहीतर तर नियम मोडणाऱ्यांना वाहतूक विभागाकडून ई चलन पाठवण्यात येते. त्या ई चलनानुसार जो दंड असेल तर तो वाहन मालकांना भरावा लागतो. मात्र मुंबईतल्या अनेक दिग्गजांनी दंड भरलेला नसल्याचे समोर येते आहे. आत्तापर्यंत एकूण 119 कोटींचा दंड वसूल होणे बाकी आहे. हा दंड न भरणाऱ्यांची एक यादीच तयार करण्यात आली आहे.

-Ads-

या यादीत राज ठाकरे, आदित्य ठाकरे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, अभिनेता सलमान खान, भाजपाचे नेते राम कदम यांची नावे आहेत. अभिनेता अर्जुन कपूरने ई चलनाद्वारे पाठवण्यात आलेला दंड भरला आहे. तर राम कदम यांच्या ज्या कारला दंड आकारण्यात आला आहे ती कार आपण काही काळापूर्वी विकल्याचे त्यांनी म्हटले आहे. ई चलन भरण्यासाठी सक्ती नसल्याने लोक दंड भरत नाहीत, असे वाहतूक विभागाने स्पष्ट केले आहे.

या संदर्भात अभिनेता सलमान खानशी संपर्क साधला असता आपल्याला कोणत्याही प्रकारचे ई चलन आलेले नाही, असे त्याच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात आले आहे. ज्या कारने नियमभंग केला त्या कारचा क्रमांक एम. एच. 02 बी. वाय. 2727 असा असून ती कार सलमानचा भाऊ अरबाझ खान याच्या अरबाझ खान प्रॉडक्‍शन प्रा. लि. कंपनीच्या मालकीची आहे.

दंड न भरलेल्या यादीत कोणाची नावे आहेत?
विनोदवीर कपिल शर्मा
महापौर विश्वनाथ महाडेश्वर
भाजप नेते राम कदम
मनसे अध्यक्ष राज ठाकरे
युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे
परिवहन मंत्री दिवाकर रावते
अभिनेता सलमान खान

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)