२०२७ पर्यंत वाढत लोकसंख्या भारत चीनला मागे टाकणार

नवी दिल्ली- लोकसंख्येच्या बाबतीत येत्या आठ वर्षात म्हणजेच २०२७ पर्यंत भारत चीनला मागे टाकणार असं संयुक्त राष्ट्राने प्रकाशित केलेल्या अहवालात म्हटलं आहे. संयुक्त राष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक कामकाज विभागाच्या लोकसंख्येसंदर्भात काम करणाऱ्या विभागाने The World Population 2019 : Highlights या नावे एक अहवाल प्रकाशित केला आहे.


वृत्त संस्थेच्या वृत्तानुसार, भारत हा २०२७ पर्यंत जगातला सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश असू शकतो ही बाब नोंदवली आहे. भारताच्या लोकसंख्येने 136 कोटींचा आकडा ओलांडला असून येणाऱ्या काळात भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असणारा देश बनणार आहे.  सध्याच्या लोकसंख्येचा विचार करता २०११ च्या आकडेवारीनुसार भारताची लोकसंख्या १.२१ अब्ज इतकी आहे तर चीनची लोकसंख्या १.३८ अब्ज इतकी आहे. लोकसंख्येच्या बाबतीत भारत चीनला येत्या आठ वर्षात मागे टाकेल असा अहवाल संयुक्त राष्ट्रांनी दिला आहे.

गेल्या काही वर्षांत देशातील लोकसंख्या झपाट्याने वाढते आहे. आजघडीला तिचे प्रमाण जवळपास 33 टक्के झाले आहे. हे प्रमाण सतत वाढतच जाणार आहे. साहाजिकच नागरीकरण हा देशासमोरचा सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक प्रश्‍न असेल. त्यादृष्टिकोनातून पाण्याचा पुरवठा, वीजपुरवठा, कचरा, निचरा आणि स्वच्छता, शहरांतर्गत रस्ते, उद्याने आणि वाहनतळाची व्यवस्था, शाळांची व्यवस्था आणि दवाखान्यांची व्यवस्था या गोष्टींचे नियोजन करायला आत्तापासूनच सुरूवात केली पाहिजे. त्याकडे दुर्लक्ष झाल्यास प्रचंड मोठा गोंधळ निर्माण होण्याची शक्‍यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)