… तर “ते’ शरीरसंबंधही अत्याचारच!

न्यायालयाने काढला निष्कर्ष 

पुणे – सोळा वर्षांच्या आतील मुलीशी तिच्या संमतीने केलेला शरीरसंबंधही बलात्कार होत असल्याचा निष्कर्ष काढत न्यायालयाने तरुणाला 10 वर्षे सक्तमजुरी आणि 5 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. त्याने प्रेम प्रकरणातून 16 वर्षांच्या मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला होता. विशेष न्यायाधीश एस. एच. ग्वालानी यांनी याबाबतचा आदेश दिला आहे.

विकास ऊर्फ विकी बाळासाहेब कांबळे (वय 19, शंकर महाराज वसाहत, चव्हाणनगर, धनकवडी) असे शिक्षा झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत 16 वर्षीय मुलीने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील विलास घोगरे पाटील यांनी आठ साक्षीदार तपासले. ही घटना 3 फेब्रुवारी 2018 नंतर चार ते पाच वेळा घडली. आरोपीने मुलीचा वारवार पाठलाग करून तिच्यावर वेळावेळी बलात्कार केल्याने मुलगी गर्भवती राहिल्याचा प्रकार उघडकीस आला होता. झालेल्या प्रकाराबाबत कोठे सांगितल्यास तिला विकासने जिवे मारण्याची धमकी दिली होती. पीडित मुलीने उलटतपासणीमध्ये विकासने तिच्याबरोबर तेव्हाही कोणत्याही प्रकारची जबरदस्ती केली नव्हती, आजही माझी त्याच्याबद्दल कोणतीही तक्रार नसून मी त्याच्याबरोबर लग्न करण्यास तयार असल्याचे म्हटले होते. त्यामुळे विकासच्या वतीने या खटल्यातून सोडण्याची मागणी करण्यात आली. याबाबत सरकारी पक्षाचे अतिरिक्त सरकारी वकील विलास घोगरे पाटील विरोध करताना जेव्हा मुलीवर बलात्कार झाला तेव्हा ती सज्ञान नव्हती. त्यामुळे विकासला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी केली होती.

दोन्ही पक्षांचा ऐकला युक्तिवाद
न्यायालयाने दोन्ही पक्षाच्या युक्तिवादानंतर विकासला बाललैगिंक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम चार आणि बलात्कार प्रकरणी 10 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)