बनावट क्रेडिट-डेबिट कार्ड बनवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

मुंबई  – देशात सध्या बॅंकांवर सायबर हल्ले होण्याच्या घटना उघडकीस येत असानाच भारतीय आणि विदेशी बॅंक खातेदारांचे डेटा चोरुन क्‍लोनिंग बनावट डेबिट-क्रेडिट कार्ड बनवणाऱ्या हायटेक रॅकेटचा मुंबई पोलिसानी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी मुंबई पोलीस गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी 6 आरोपींना अटक केली आहे.

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास करून 6 आरोपींना अटक केली. कस्तूराम सोलंकी, मदनकुमार सुन्देसा, रमेश चंद्रन, दीपक गहलोत, चंदनसिंग राव आणि कोलावोले हकीम ही या प्रकरणातील अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. कलम 411, 420, 66(डी) , 66(सी) इनफार्मेशन टेक्‍नोलॉजी एक्‍ट अंतर्गत पोलिसांनी या प्रकरणी आरोपींवर कारवाई केली आहे.

-Ads-

मुंबईतल्या नागपाडा पोलीस ठाण्यात गीता चौहाण या महिलेने याबाबतची तक्रार नोंदवली होती. तक्रारदार गीता चौहाण त्यांच्या नोकरीसाठी ग्रीसमध्ये होत्या. 7 जून ते 11 जून दरम्यान त्यांच्या डेबिट कार्ड खात्यातून 2,16,000 रुपये अचानक गायब झाले. पैसे जेव्हा गायब झाले त्यावेळी त्यांचे डेबिट कार्ड त्यांच्याकडे होते. अटक झालेल्या आरोपींकडून अनेक बॅंक खातेदारांच्या क्रेडिट-डेबिट कार्ड डाटा सापडला आहे. या सहाही आरोपींचे क्रिमिनल बॅकग्राऊंड असल्याचे पोलिसांनी सांगितले


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)