व्यावसायिकांनो हे वागणं बरं नव्हं

वाई शहरातील झाडांना फ्लेक्‍सचा विळखा : झाडांमध्ये ठोकले जाताहेत खिळे

पर्यावरणप्रेमींमधून संतप्त प्रतिक्रिया
संबंधित व्यावसायिक, व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी
वृक्ष संवर्धन संस्था राबविणार “झाडांवरील खिळे हटाव मोहिम’

धनंजय घोडके

वाई – व्यावसायिक, व्यापाऱ्यांना आपल्या व्यवसायाची जाहिरात करण्याचा पूर्ण हक्क आहे. मात्र, वाई शहरातील व्यापारी, व्यावसायिकांनी सर्व नियम धाब्यावर पसून रस्त्याकडेला असणाऱ्या झाडांवर खिळे ठोकून आपल्या व्यवसायाची जाहिरातबाजी सुरु केली आहे. व्यावसायिकांची ही जाहिरातबाजी अप्रत्यक्ष पर्यावरणाच्या मुळावर उठत असल्याने पर्यावरणप्रेमींमधून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या असून संबंधित व्यापारी, व्यावसायिकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

तालुक्‍यातील मांढरदेव तसेच सुरुर येथील धावजीबुवा या देवस्थान परिसरात इच्छापूर्तीसाठी झाडांना खिळे ठोकण्याचा प्रकार आजच्या विज्ञान युगातही सुरु आहे. या प्रकारामुळे झाडांची हानी होऊन पर्यावरणाचा ऱ्हास होत आहेच. हे सर्व कमी आहे की काय म्हणून वाई शहरातील व्यापाऱ्यांनी आपल्या व्यवसायाच्या जाहिरातीसाठी झाडांचा आधार घेतला असुन हे व्यापारी, व्यावसायिक झाडांवर आपल्या व्यवसायाच्या जाहिरातीचा फ्लेक्‍स लावत आहेत आणि हे फ्लेक्‍स लावण्यासाठी ते झाडांवर खिळे ठोकत आहेत. महत्वाच्या ठिकाणी असलेल्या झाडांवर बुडक्‍यापासून ते शेंड्यापर्यंत जागा मिळेल तिथे व्यावसायिकांनी खिळ्याच्या सहाय्याने जाहिरातीचे फ्लेक्‍स लावले आहेत. या प्रकारामुळे झाडांची होनी होत आहे.

व्यावसायिकांकडून सुरु असलेला हा प्रकार एकप्रकारे पर्यावरणाच्या मुळावरच उठला असून पर्यावरण प्रेमींकडून संताप व्यक्त होऊ लागला आहे. दरम्यान, झाडांवर खिळ्यांच्या सहाय्याने फ्लेक्‍स लावलेल्या व्यापारी, व्यावसायिकांवर वनविभागाच्या कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे.
झाडांवर खिळे काढण्यासाठी मोहिमेची आखणी व्यापारी, व्यावसायिकांकडून आपल्या व्यवसायाच्या जाहिरातीसाठी झाडांचा वापर सुरु आहे. जाहिरातीचे फ्लेक्‍स झाडांवर खिळ्यांच्या सहाय्याने ठोकले जात आहेत. यामुळे झाडांची हानी होत असून याचा पर्यावरणावरण परिणाम होत आहे. त्यामुळे शहरातील वृक्ष संवर्धन संस्था झाडांवर ठोकलेले खिळे काढण्यासाठी मोहिम राबविणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)