उद्योगांनी कृषी क्षेत्रात गुंतवणूक करावी

पंतप्रधानांनी साधला निवडक उद्योजकांशी संवाद
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी मुंबईत उद्योजकांशी संवाद साधला. भारतीय अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांचे प्रतिनिधीत्व करणारे 41 उद्योजक यावेळी उपस्थित होते. गेल्या चार वर्षात केंद्र सरकारने हाती घेतलेले विविध उपक्रम आणि धोरण सुधारणा यावर दोन तासांपेक्षा अधिक काळ विस्तृत चर्चा झाली. आर्थिक वृद्धी आणि विकासात उद्योगांच्या योगदानावरही तपशिलात चर्चा झाली.

देशातील वातावरण व्यवसायपूरक होत असून या संदर्भातील सुधारणांचे उद्योग जगतातल्या अनेक प्रतिनिधींनी कौतुक केले. यामुळे भारताची विकासक्षमता खऱ्या अर्थाने अस्तित्वात येईल असे सांगून उद्योजकांनी पंतप्रधानांच्या नवभारताच्या संकल्पनेचे यावेळी कौतुक केले. स्टार्टअप्स आणि व्यावसायिकांबरोबर अलीकडे केलेल्या चर्चेबाबतही पंतप्रधान बोलले. सकारात्मक मनोवृत्ती आणि करु शकतो हा विश्वास आता देशात दिसून येतो. मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्याचे विशेषत: कृषी क्षेत्रात गुंतवणूक करण्याचे आवाहन त्यांनी उद्योग क्षेत्राला केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

देशांतर्गत उत्पादन निर्मितीला चालना देण्यावर त्यांनी यावेळी भर दिला. वैद्यकीय उपकरणे, इलेक्‍ट्रॉनिक्‍स आणि संरक्षण साधने अशा क्षेत्रात उत्पादन वाढीला चालना देण्याची गरज पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केली. मोबाईल आणि दैनंदिन जीवनात लागणाऱ्या इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंची देशात आता पुरेशी निर्मिती होत आहे. त्यामुळे आयातीचा परकीय चलनाचा खर्च वाचतो. तत्पूर्वी, गेल्या चार वर्षात अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने योजलेल्या विविध उपक्रमांची माहिती हंगामी अर्थ मंत्री पियुष गोयल यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)