मराठा आंत्रप्रिनर्स असोसिएशनचे प्रदर्शन

-16 व 17 मार्च रोजी प्रदर्शन महालक्ष्मी लॉन्स येथे होणार

-फॅशन, फर्निचर, इंटेरियर, उत्पादनांचा समावेश

पुणे  -मराठा आंत्रप्रिनर्स असोसिएशन ही मराठा समाजातील उद्योजकता विकास हे ध्येय असलेली संस्था असून असोसिएशन तर्फे विविध उपक्रम राबविण्यात येतात. याचाच भाग म्हणून दर्जेदार उत्पादनांचे भव्य प्रदर्शन बिझनेस एक्‍सपो 2019 आयोजित करण्यात आले आहे.

मराठा व्यावसायिकांचे व्यवसाय, सेवा उत्पादन यांना व्यासपीठ देण्यासाठी सादर करीत असलेले मराठा आंत्रप्रिनर्स असोसिएशन हे मेगा मल्टी प्रॉडक्‍ट एक्‍झिबिशन 16 व 17 मार्च 2019 रोजी सकाळी दहा ते रात्री दहा या वेळेत महालक्ष्मी लॉन्स, राजाराम पुलाजवळ कर्वेनगर पुणे येथे संपन्न होत आहे. लाईफ स्टाईल, फॅशन, फर्निचर, इंटेरियर, लीजर, हॉस्पिटॅलिटी, रियल इस्टेट, हार्डवेअर, इलेक्‍ट्रॉनिक्‍स, फूड प्रॉडक्‍टस्‌ या क्षेत्रातील विविध उत्पादने बिझनेस एक्‍सपो 19 मध्ये सादर केली जाणार आहेत. या ठिकाणी स्वादिष्ट खाद्यपदार्थांची खाऊ गल्ली ही उपलब्ध असणार आहे. यामुळे बिझनेस एक्‍स्पोत सहकुटुंबही येता येईल. गुणवत्ता, उत्तम नेटवर्क व जनसंपर्क आणि साहचर्याचा दृष्टिकोन यातून साकारलेले हे प्रदर्शन आहे.

बिझनेस एक्‍स्पो ही जशी मराठा उद्योजकासाठी भरभराटीची संधी आहे. तशी कितीतरी प्रकारची उत्पादने या ठिकाणी बघायला मिळणार आहेत. यामुळे सर्व वयोगटासाठी ही सुवर्णसंधी असून याचा नागरिक लाभ घेतील, अशी आशा आयोजकांनी व्यक्‍त केली आहे. ही माहिती मराठा आंत्रप्रिनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अंकुश आसबे यांनी एका पत्रकाद्वारे जारी केली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)