बस आणि दुचाकीचा भीषण अपघात ; १ ठार १० जखमी

कोल्हापूर: ट्रॅव्हल्सची- टु व्हीलरला समोरा समोर धडक दिल्याने टुव्हीलर वरील सुरेश शंकर चव्हाण हा इसम जागीच ठार झाला आहे. ही घटना कोल्हापूर-सांगली बायपास रोड जैनापूर इथं दुपारी घडली आहे, या अपघातात टुव्हीलर होंडा एच.एफ.डीलक्स जळून खाक झाली आहे तर ट्रॅव्हल मधील १० प्रवाशी जखमी झाला आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील कोल्हापूर- सांगली मार्गावरील जैनापूर इथं कोल्हापूरहुन सांगली कडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्स क्रमांक (KA-51-AC-7547)जात असताना ट्रकला ओव्हटेक करताना समोरून टु-व्हीलर ला समोरासमोर धडक देऊन टुव्हीलरला जवळपास दोनशे फूट फरफटत नेले यामध्ये सांगलीहुन रुकडी आपल्या घरी आपल्यावरून जाणाऱ्या सुरेश चव्हाण (रा.रुकडी) ता.हातकणंगले हा जागीच ठार झाला.ही घटना बुधवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास कोल्हापूर -सांगली बायपास रोड जैनापूर येथे घडली आहे, धडक इतकी जोराची होती की यामध्ये सुरेश चव्हाण (वय ३२) याची टुव्हीलर होंडा एच.एफ.डीलक्स जळून खाक झाली आहे,तर ट्रॅव्हल्स बाजूच्या शेतात पलटी झाली आहे यामध्ये २७ प्रवाशी होते यापैकी १० प्रवाशी जखमी झाले आहेत,या घटनेची माहीती मिळाल्यानंतर जयसिंगपूर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन जखमींना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. तर मयत यास समर्पण सेवा संस्थेच्या रुग्णवाहिकेतून शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले आहे, या अपघाताची नोंद जयसिंगपूर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)