जमशेदपूर – झारखंड येथील सिंहभूम जिल्ह्यात बस पलटून झालेल्या अपघातात 3 जणांचा मृत्यू तर 35 जण जखमी झाले आहेत. पोलीसानी दिलेल्या माहितीनुसार बस बिहारच्या रक्सौल या गावाकडे जात होती. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस पलटून हा अपघात झाला.

अपघातामध्ये एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला तर इतर दोघांचा रूग्णालयातील उपचारादरम्यान मृत्यू झाला. जखमींना बहारागोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले होते मात्र तेथील डाॅक्टरांनी जखमीना सरकारी एमजीएम रूग्णालयात पाठविले.

जखमीपैकी 15 जणांना एमजीएम रूग्णालयात दाखल करण्यात आले तर काही जखमीना प्रथमोपचारानंतर रूग्णालयातून सोडून देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)