साताऱ्यात “जला दो, जला दो, पाकिस्तान जला दो’च्या घोषणा

पाकिस्तानवरील हल्ल्यानंतर फटाक्‍यांच्या आतषबाजीसह साखर, पेढे वाटून साजरा केला आनंदोत्सव

सातारा – 14 फेब्रुवारी रोजी पुलवामा येथे भारतीय जवानांवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा मंगळवारी भारतीय वायुसेनेने पाकव्याप्त काश्‍मिरमध्ये घुसून जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर 1000 किलो वजनाचे बॉम्ब टाकून बदला घेतला आहे. भारताने केलेल्या या कारवाईचे सातारकर नागरिकांनी फटाके वाजवून तसेच साखर, पेढे वाटून अभिनंदन केले.

पुलवामा येथे 14 रोजी भारतीय जवानांच्या वाहनाच्या ताफ्यावर दारुगोळ्यांनी भरलेल्या कारचा अपघात घडवून हल्ला करण्यात आला होता. दहशतवाद्यांच्या या हल्ल्यात सुमारे 49 जवान शहिद झाले होते. या घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली होती. तसेच या हल्ल्याचा वेगवेगळ्या प्रकारे निषेध करुन पाकचा बदला घेण्याची मागणी होत होती. त्या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी पहाटे भारतीय वायूसेनेच्या मिराज या लढाऊ विमानांनी पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये घुसून जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर 1000 किलोग्रॅम वजनाचे बॉम्ब टाकून दहशतवाद्यांचे तळ नष्ट केले. ही वार्ता समजताच देशात जल्लोषाचे वातावरण झाले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

साताऱ्यातही मोतीचौक येथे सातारकर नागरिकांनी फटाके वाजवुन तसेच पेढे, साखर वाटप करून जल्लोष साजरा केला. यावेळी भारतीय हवाई दलाचे आणि सैन्य दलाचे सर्वांनी अभिनंदन करत “जला दो, जला दो, पाकिस्तान जला दो’च्या घोषणा दिल्या. भारतीय वायुसेनेच्या आजच्या हवाई हल्ल्याने प्रत्येक भारतीयाच्या मनात जल्लोशाचे आणि उत्साहाचे वातावरण तयार झाल्याचे पहायला मिळाले.

भारतीय वायूसेनेच्या मिराज या लढाऊ विमानांनी पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये घुसून जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर 1000 किलोग्रॅम वजनाचे बॉम्ब फेकल्याच्या वार्तेने सर्वत्र जल्लोष साजरा होत आहे. या हवाई हल्यामुळे भारताने पाकिस्तानला चोख उत्तर दिले आहे, अशी भावना आज जल्लोषकर्त्याच्या मनात होती. या वेळी भाजपचे दीपक पवार, नगरसेवक किशोर शिंदे, विजय काटवटे, आशा पंडित, किशोर पंडित, धनंजय खोले, धीरज घाडगे व सातारकर नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)