बुर्किना फासोत जिहादी हल्ला ; 12 ठार

क्वागाडौगोऊ: बुर्किना फासोच्या उत्तरेकडील भागात गुरूवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 12 जण ठार झाले तर अन्य अनेक जण जखमी झाले आहेत. पुर्व अफ्रिकेतील या देशाने आपल्या देशातील अनेक प्रांतात गेल्या वर्षीच्या अखेरीला आणिबाणी जाहीर केली आहे. या देशात इस्लामिक कट्टरपंथीयांनी मोठाच उच्छाद मांडला असून हे हल्ले रोखण्यास अपयश आल्याने त्या देशाच्या लष्कर प्रमुखांनाही अलिकडेच बदलण्यात आले होते परंतु तरीही हे हल्ले अजून थांबलेले नाहीत.

गुरूवारी रात्रीच्या घटनेसंबंधात माहिती देताना सुरक्षा मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले की हल्लेखोरांनी एका गावातील बाजारपेठेत हा हल्ला करून तेथे बारा जणांना ठार मारले. त्यांच्या हल्ल्यात जखमी झालेले अनेक जण मृत्यूशी झुंज देत आहेत. ज्या गावात हा हल्ला झाला त्या गावाचे नाव गस्सेलिकी असे आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सुमारे तीस हल्लेखोरांनी बंदुका व बॉंम्बच्या सहायाने हा हल्ला केला. त्यांनी तेथे सहा दुकाने आणि काही गाड्याही पेटवून दिल्या. सन 2015 पासून त्या देशात जिहादी हल्ले होत आहेत. पुर्वी देशाच्या उत्तरेकडील भागात इस्लामिक कट्टरपंथीय असे प्रकार करायचे आता त्यांच्या हल्ल्याचे लोण देशाच्या पुर्व भागातही पोहचले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)