साताऱ्यात दिवसाढवळ्या दोन ठिकाणी घरफोडी

सातारा: सातारा शहरातील गजबजलेल्या प्रतापगंज पेठेत चोरट्यांनी हात साफ केल्याच्या दोन घटना घडल्या. यात लाखो रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते.

शहरातील निसर्ग कॉलनी व प्रतापगंज पेठेत अशा दोन ठिकाणी चोरट्यांनी डल्ला मारला. यातील निसर्ग कॉलनीतील चोरीचा तपाशील समजु शकला नाही. तर प्रतापगंज पेठेतील काळेश्वरी अपार्टमेंटमधील जयंत राजाराम काटे यांचा फ्लॅट सायंकाळी सहा ते सातच्या सुमारास फोडुन चोरट्यांनी रोख रक्कम पस्तीस हजार व दीडशे ग्रॅम चांदीचे दागिने लंपास केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

काटे यांच्या घरी कोणी नसल्याचा फायदा चोरट्यांनी घेतला. घटनेची माहिती मिळताच सातार्‍याचे उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासह शाहूपुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार, पुष्पा किर्दत यांच्यासह गुन्हे प्रकटीकरणच्या अधिकार्‍यांनी भेट दिली. घटनास्थळी ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)