कोल्हापूर (प्रतिनिधी) – अट्टल घरफोडी, सरकारी पिस्टल, राऊंड आणि सोन्याचे दागिने असा 10 लाख 11 हजाराचा मुद्देमाल चोरी केल्याचा प्रकार आज कोल्हापूर पोलिसांनी उघडकीस आणला. मूळचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी इथं रहाणारा राजू तुकाराम सुतार असे संशयित आरोपीचे नाव आहे. त्याने 10 घरफोड्या केल्या असल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.
कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात घरफोड्यानी धुमाकूळ घातला आहे. त्याचा तपास करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी दिला. पोलीस पथक शोध घेत असता जुना शिंगणापूर नाका येथून हातात पिशवी घेऊन जात होता. त्याला हटकले असता तो पळून गेला. त्याला निवास पाटील व रोहित मर्दाने यांनी पाठलाग करून पकडले. त्याने राजू सुतार असे नाव असल्याचे त्याने सांगितले.
त्याची पिशवी तपासली असता दोन कटावणी, स्क्रू ड्रायव्हर, कात्री, कटर अशी घरफोडीसाठी वापरात आणले जाणारे साहित्य त्याच्या कडे सापडले. पोलिसांची त्याची चौकशी केल्यानंतर त्याने रंकाळा स्टँड जवळील गंभीर घरफोडी केल्याची कबुली दिली. त्याला तेव्हा अटक केली होती. कोल्हापूर, सांगली, रायगड जिल्ह्यात घरफोडी व चोरीचे 7 गुन्हे त्याच्यावर दाखल झाले आहेत. दरम्यान, पोलिसांनी आरोपी कडून चोरलेले सरकारी पिस्टल ,28 राउंड, 26 तोळे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या चोरट्याचा आणखी एक साथीदार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या चोरट्याने सांगली ,सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात चोऱ्या केल्या आहेत.