माणिकनगर येथे घरफोडी 

नगर  – मानिकनगर येथील बंगल्याच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरातील सामानाची उचकापाचक करून 30 साड्या व जुना टिव्ही असा सुमारे 20 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना शनिवार (दि.22) ते सोमवार (दि.24) च्या दरम्यान नगर-पुणे रोडवरील माणिकनगर येथील चंद्रमोती बंगला येथे घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, सुमित संतोष वर्मा (वय-30, रा. आनंद कॉलनी, माणिकनगर) यांनी त्यांच्या घरात असलेल्या लग्न समारंभाकरिता आणलेल्या नवीन 30 साड्या (किंमत अंदाजे 18 हजार) घरात ठेवल्या होत्या. वर्मा कुटुंबीय कामानिमित्त बाहेर गेले असताना कोणीतरी अज्ञात चोराने त्यांच्या बंगल्याच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी सुमित वर्मा यांच्या फिर्यादीवरून घरफोडीचा गुन्हा दाखल केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)