#CWC19 : बुमराहच्या 57 सामन्यात 100 विकेट्‌स

लीड्‌स – भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने आजच्या सामन्यात एक अनोखा विक्रम आपल्या नावे केला असून केवळ 57 सामन्यात 100 बळी मिळवत भारताकडून सर्वात कमी सामन्यात 100 बळी मिळवणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत बुमराह दुसरा तर जगातील सर्व संघांचा विचार करता बुमराह हा नववा गोलंदाज ठरला.

बुमराहच्या आधी हा रेकॉर्ड मोहम्मद शमी याच्या नावावर आहे. शमीने 56 सामन्यांमध्ये 100 विकेट्‌स घेतल्या होत्या. वर्ल्ड क्रिकेटमध्ये सर्वाधिक फास्ट विकेट्‌स घेणाऱ्यांच्या यादीत शमी 8व्या स्थानावर आहे. वन-डे क्रिकेटमध्ये सर्वात फास्ट 100 विकेट्‌स घेणाऱ्या बॉलर्सच्या यादीत अफगाणिस्तानचा युवा लेग स्पिनर राशिद खान हा अव्वल स्थानावर आहे. राशिद खान याने 44 वन-डे मॅचेसमध्ये 100 विकेट्‌स घेतल्या आहेत. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर मिचेल स्टार्क आहे. स्टार्क याने 52 वन-डे मॅचेसमध्ये 100 विकेट्‌स घेतल्या आहेत.

सध्या सुरू असलेल्या वर्ल्ड कप 2019 ची सुरूवात होण्यापूर्वी क्रिकेट विश्वातील दिग्गजांचे म्हणने होते की, बुमराह टीम इंडियासाठी हुकुमाचा एक्का ठरेल. दिग्गजांनी केलेली ही भविष्यवाणी बुमराह याने योग्य असल्याचं साध्य करुन दाखवले आहे. बुमराह यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. बुमराहने आतापर्यंत वर्ल्ड कपच्या 8 मॅचेसमध्ये 16 विकेट्‌स घेतल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)