बुमराहने केली ‘कॅप्टन कुल’ ची पाठराखण – बुमराह

विशाखापट्टणम – भारतीय संघाने मोक्‍याच्यावेळी काही महत्वपूर्ण गडी गमावल्याने मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश येत होते. महेंद्रसिंग धोनीने केलेली संथ खेळी ही योग्य असून त्याच्याच खेळीमुळे भारताला सन्मानजनक धावसंख्या उभारती आली, असे भारताचा आघाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमराहने सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये धोनीचा बचाव करताना म्हटले आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या टी- 20 सामन्यात कमी धावसंख्येचा बचाव करताना अखेरच्या षटकात भारतीय संघाला पराभूत व्हावे लागले. या सामन्यात गोलंदाजांनी आपली जबाबदारी योग्यरित्या पार पाडली; परंतु धावसंख्या उभारताना महेंद्रसिंग धोनीने 38 चेंडूत 27 धावांची संथ खेळी केली होती. त्याच्या खेळीवर अनेक स्तरातून टीका होत आहे.

प्रथम फलंदाज करताना भारताची स्थिती एकवेळ 2 बाद 80 अशी होती. त्यानंतर भारतीय संघाची पडझड झाली आणि अवस्था 7 बाद 107 अशी झाली होती. अखेरच्या 11 षटकांत भारताने केवळ 47 धावा जमविल्या. त्या दरम्यान 20 व्या षटकांत धोनीने एकमेव मोठा फटका अर्थात षटकार ठोकला होता. याबाबत बोलताना बुमराह म्हणाला, संघाचा डाव सावरत बचावकरण्यास पुऱ्या ठरतील इतक्‍या धावा उभारून देण्याचा प्रयत्न धोनी करत होता. या खेळपट्टीवर चेंडू कमी उसळी घेत असल्याने ही खेळपट्टी गोलंदाजांसाठी उपयुक्त ठरत होती. त्यामुळे येथे धावा जमवणे अवघड होत होते. आम्हाला आणखी 15- 20 धावा करायला हव्या होत्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

लोकेश राहुल बाद झाल्यावर महेंद्रसिग धोनीने जास्तीत जास्त चेंडूचा सामना केला. त्यात त्याने एकेरी धाव घेण्याचे टाळले तर आखूड टप्प्याचे चेंडू टाकत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी धोनीला मोठे फटके सहजतेने खेळू दिले नाही.
ऑस्ट्रेलियासाठी आक्रमक फटकेबाजी करत सामना जिंकून देणारा ग्लेन मॅक्‍सवेल सामन्यानंतर म्हणाला, महेंद्रसिंग धोनीने केलेली खेळी योग्यच होती. संघातील आघाडीचे सर्व फलंदाज बाद झाले असताना ज्यांच्याकडे मोठे फटके खेळण्याची जास्त क्षमता नाही अश्‍या खेळाडूंना चेंडुचा सामना करु न देणे मला बरोबर वाटते. धोनीकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे; परंतु जर त्यालाच या खेळपट्टीवर खेळताना धावा बनवण्यासाठी झगडावे लागत असेल तर तळातील फलंदाज मोठे फटके खेळू शकले नसते. त्यामुळे त्याने काहीवेळा एकेरी धावा घेणे टाळले आणि बारकाईने विचार केला तर ते योग्यच आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)