बुमराह विरोधी खेळाडूंसाठी डोकेदुखी ठरतो- पेट कमिन्स

बेंगळुरू: भारताचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह हा अचूक आणि जलद असून क्रिकेटच्या तीनही प्रकारात तो विरोधी खेळाडूंसाठी डोकेदुखी ठरतो आहे, असे म्हणत ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज पेट कमिन्सने बुमराहाची स्तुती केली. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या टी- 20 सामन्यांत ऑस्ट्रेलियाच्या डावात बुमराहने 19 व्या षटकात 2 धावा देत 2 बळी मिळवत सामना रोमांचक स्थितीत पोहचवला होता.

कमिन्स म्हणाला, बुमराह गोलंदाजीच्या दोन मूलभूत गोष्टी अचूकता आणि गती यानुसार गोलंदाज करतो. या दोन गोष्टीसह जो कोणीही गोलंदाजी करत असेल तर तो जगातील कोणत्याही फलंदाजासमोर अडचण निर्माण करू शकतो. त्याचबरोबर त्याचाकडे गतीमध्ये बदल करण्याची क्षमता आहे. तो त्याच्या कौशल्याचा योग्य वापर करतो ज्यामुळे त्याच्याविरुद्ध खेळताना अडचणी निर्माण होतात, असेही कमिन्स म्हणाला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)