#Budget 2019: वाचा…अर्थसंकल्पावर सत्ताधारी आणि विरोधकांच्या प्रतिक्रिया !

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्रिपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आलेले पियूष गोयल यांनी आज अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. गोयल यांनी लोकसभेत २ तास अर्थसंकल्पावर भाषण दिले. दरम्यान, त्यांनी मोदी सरकारची ५ वर्षाची कामगिरी सांगितली. तसेच अनेक आश्वासने आणि घोषणा केल्या. अनेक राजकीय नेत्यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.


असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी तीन हजार रुपये पेन्शन असो किंवा शेतकऱ्यांना प्रतिवर्षी सहा हजार रुपयांचे अर्थसहाय्य, अशा निर्णयातून देशातील सरकारने सर्वसामान्य घटकांच्या उत्थानातून आणखी एक पाऊल पुढे टाकण्याचा निर्धार केल्याचे दिसून येत आहे. मनरेगासाठी अधिकची तरतूद केल्याने ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


अर्थमंत्री अरुण जेटली उपचारासाठी अमेरिकेला गेले असल्यामुळे केंद्रीय अर्थमंत्रिपदाचा अतिरिक्त कार्यभार पियूष गोयल यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. जेटली यांच्या गैरहजेरीत गोयल यांनी शुक्रवारी 2019-20 चा अंतरिम बजेट मांडले.

त्यानंतर जेटली यांनी ट्टिट करत म्हटलं आहे की, हे बजेट प्रगतीच्या दिशेने देशाला घेऊन जाणारे आहे. गरीबांना शक्ती देणारा, मध्यमवर्गाची स्वप्ने साकार करणारा आणि श्रमिकांना सन्मान देणारा तसेच सर्वाना अनुकूल असा हा अर्थसंकल्प आहे.

त्यांनी म्हटले, वर्ष 2014 ते 2019 दरम्यानचे सारे बजेट मध्यम वर्गांना दिलासा देणारे ठरले आहेत. जेटलीने म्हटले हे बजेट वित्तीय तूट नियंत्रणात आणणारे बजेट आहेत.


काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बजेट 2019 मध्ये घोषित करण्यात आलेली प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेवर टिका करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाना साधला आहे. तसेच शेतकऱ्यांस दररोज 17 रूपये देणं म्हणजे हा शेतकऱ्यांचा अपमान असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. यासोबतच राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये #AakhriJumlaBudget हा हॅशटॅग वापरला आहे.

राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटले आहे की , “प्रिय नरेंद्र मोदी जी, तुमच्या पाच वर्षांच्या अकार्यक्षमता आणि अहंकाराने आमच्या शेतकऱ्यांचे जीवन बर्बाद केले आहे. त्यांना 17 रूपये प्रतिदिवस देणे म्हणजे त्या प्रत्येक गोष्टींचा अपमान आहे ज्यासाठी शेतकरी उभे राहिले होते आणि त्यासाठी काम करत होते”.


केंद्रीय अर्थमंत्रिपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आलेले पियूष गोयल यांनी आज अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. गोयल यांनी या देशातील साधन संपत्तीवर गरीबांचा पहिला अधिकार असल्याचे विधान केले.  देशाच्या आर्थिक विकासाचा लाभ गरीबांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे सरकार प्रामाणिक प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


 

अर्थमंत्री पियुष गोयल यांनी आज संसदेत सादर केलेले बजेट म्हणजे, वोट ऑन अकाऊंट नव्हते तर ते अकाऊंट फॉर वोट होते, अशी टीका त्यांनी केली आहे.

आगामी निवडणुकांच्या पाश्वभूमीवर मोदी सरकाने मतांसाठी अर्थसंकल्पात घोषणा केल्या. तसेच देशातील गरीबांचा देशाच्या साधनसंपत्तीवर पहिला अधिकार आहे हे जाहीर करून गोयल यांनी कॉंग्रेसच्याच धोरणाची कॉपी केल्याचे चिदबंरम म्हणाले.

वित्तीय तुट आटोक्‍यात ठेवण्याचे उद्दीष्ठ सरकारला साध्य करता येणार नाही अशी टिपण्णी आपण या आधी केली होती ती आता खरी ठरली आहे. चालू खात्यावरील तुट अडीच टक्‍क्‍यांपर्यंत गेली आहे. हा सरकारसाठी धोक्‍याचा इशारा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


अर्थसंकल्पातून देशातील १३० कोटी जनतेला ऊर्जा मिळेल. हे सर्वव्यापी, सर्वसमावेशक बजेट आहे. आमचे सरकार प्रत्येक नागरिकाला विकासाच्या प्रवाहाशी जो़डण्यााचा प्रयत्न करत असून समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे. देशाच्या पुढच्या दशकभराच्या गरजा लक्षात घेऊन या अर्थसंकल्पात योजनांचा समावेश करण्यात आला असल्याचे नरेंद्र मोदी म्हणाले.


पियूष गोयल यांनी सादर केलेला हंगामी अर्थसंकल्प निवडणुकांशी संबंधित असून मे महिन्यात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीवर या अर्थसंकल्पाचा परिणाम दिसून येईल. निवडणूक वर्षातील मध्यमवर्ग, छोटे शेतकरी आणि ग्रामीण लोकसंख्येला सुखावणारा असा हा अर्थसंकल्प आहे. हे इलेक्शन बजेट असल्याचे मनमोहन सिंग म्हणाले.

-मनमोहन सिंग


 

हे इंटरिम बजेट आहे, हे काही फुलफ्लेज बजेट नाही, आणि ते मांडायचा अधिकारही या सरकारला नव्हता, तसे जर असते तर आमचे सरकार आल्यावर आम्ही बजेट पुन्हा सादर करू असे त्यांनी जाहिर केले असते. आज ज्या घोषणा या सरकारने केल्या त्या पूर्ण विचार न केलेल्या अर्धवट घोषणा आहेत. देशातील आपली सत्ता जाणार याची जाणीव होऊन काही कोटी लोकांना केवळ आकर्षित करण्यासाठीचा हा असफल प्रयत्न आहे. 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)