#Budget 2019 : 64 हजार 500 कोटींची रेल्वे खात्यासाठी तरतूद

नवी दिल्ली – केंद्रीय अर्थमंत्रिपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आलेले पियूष गोयल आज अंतरिम अर्थसंकल्प सादर करत आहेत. लोकसभा निवडणूक तोंडावर आल्याने मतदारांना खूष करण्याची अखेरची संधी त्या माध्यमातून मोदी सरकार साधेल,अशी शक्‍यता आहे. गोयल यांच्याकडून मांडला जाणारा अर्थसंकल्प सरकारचा सहावा आणि अंतिम अर्थसंकल्प ठरणार आहे.

या अर्थसंकल्पात पियूष गोयल यांनी रेल्वे खात्यासाठी 64 हजार 500 कोटींची तरतूद केली आहे महत्त्वपूर्ण तरतूद केली आहे. वंदे भारत हायस्पीड ट्रेन पहिल्यांदाच भारतात धावणार आहे. मानवरहित रेल्वे क्रॉसिंग बंद करण्यात आल्याची माहिती गोयल यांनी दिली आहे. 3 लाख 38 हजार बोगस कंपन्यांना टाळं लावलं, एक कोटी नागरिकांनी नोटाबंदीनंतर कर भरला, एक लाख 36 हजार कोटींची करवसुली झाली. जनधन योजनेअंतर्गत 34 कोटी बँक खाती उघडली, यंदा करदात्यांची संख्या वाढली, 12 लाख कोटी रुपये कर स्वरूपात मिळाले आहेत, पाच वर्षांत विमान प्रवाशांची संख्या दुप्पटीने वाढली.

#Budget 2019 : इन्कम टॅक्सची मर्यादा 5 लाखांपर्यंत वाढवली

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here