#Budget 2019 : शिक्षण क्षेत्रासाठीच्या तरतुदीत 10 टक्‍क्‍यांनी वाढ 

अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रासाठी 93 हजार 847 कोटी रूपयांची तरतूूद करण्यात आली आहे. मागील वेळेपेक्षा ती 10 टक्‍क्‍यांनी अधिक आहे. आता उच्च शिक्षणासाठी 37 हजार 461 कोटी रूपये तर शालेय शिक्षणासाठी 56 हजार 386 कोटी रूपये उपलब्ध होतील. प्रमुख शिक्षण संस्थांमधील संशोधन आणि संबंधित पायाभूत सुविधांसाठी पुढील चार वर्षांत 1 लाख कोटी रूपयांच्या गुंतवणुकीचा समावेश असणाऱ्या योजनेचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. संशोधन आणि नावीन्याशी निगडीत उपक्रमांसाठी 608 कोटी रूपये राखून ठेवण्यात आले आहेत. शिक्षणाचा दर्जा सुधरवण्याच्या उद्देशातून ब्लॅक बोर्ड ते डिजिटल बोर्ड असे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here