#Budget 2019 :कामगारांना 7 हजाराचा बोनस

नवी दिल्ली – केंद्रीय अर्थमंत्रिपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आलेले पियूष गोयल आज अंतरिम अर्थसंकल्प सादर करत आहेत.  या अर्थसंकल्पात  पियूष गोयल यांनी नोकरदारांसाठी मोठी घोषणा केली आहे.

पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजनेअंतर्गत असंघटित कामगारांना दरमहा ३ हजार रुपये पेन्शन मिळणार आहे. ग्रॅच्युइटीची मर्यादा 10 लाखांवरून 20 लाख करण्यात आली. तसेच 21 हजार पगार असलेल्यांना 7 हजार बोनस देण्यात येणार आहे. ईपीएफओच्या माध्यमातून हा 7 हजार बोनस मिळणार असल्याचंही गोयल यांनी जाहीर केलं आहे. प्रतिमहिना 15 हजार रुपयांहून अधिक पैसे कमावणाऱ्या मजुरांना श्रमयोगी मानधन योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच मजुरांच्या मृत्यूनंतर 6 लाखांची नुकसानभरपाईसुद्धा देण्यात येणार आहे. तसेच प्रतिमहिना 15 हजार रुपयांहून अधिक पैसे कमावणाऱ्या मजुरांना श्रमयोगी मानधन योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच मजुरांच्या मृत्यूनंतर 6 लाखांची नुकसानभरपाईसुद्धा देण्यात येणार आहे. मात्र या अर्थसंकल्पात नोकरदारांना जीएसटीतून सवलत नाही. छोट्या व्यापाऱ्यांना मात्र जीएसटीत सवलत मिळणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)