अर्थसंकल्प २०१८ : सेन्सेक्स १५० अंकांनी वधारला

नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर गुरूवारी शेअर बाजाराने उसळी घेतली. आज शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक अनुक्रमे १५० आणि ५० अंकांनी वधारले. त्यामुळे सेन्सेक्स ३६,१२७.२० च्या पातळीवर जाऊन पोहोचला तर निफ्टीने ११,६०७.२५ ची पातळी गाठली आहे.

मात्र, आता केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर शेअर  बाजाराचा मूड कसा असेल, हेदेखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)