पाकिस्तान तोंडघशी; बडगाम दुर्घटनाग्रस्त चॉपर पाडले नसल्याची कबूली 

नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरस्थित बडगाम जिल्ह्यातील दुर्घटनाग्रस्त भारतीय वायुसेनेचे M-१७ चॉपर हे लढाऊ विमान पाडल्याच्या दावा पाकिस्तानने केला होता. परंतु, काही तासातच पाकिस्तानने युटर्न घेत बडगाम दुर्घटनेतील चॉपर पाडले नसल्याचे कबूल केले आहे.

पाकिस्तान लष्कराचे प्रवक्ते आसिफ गफूर यांनी म्हंटले कि, पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी भारताचा काही भागांमध्ये बॉम्ब हल्ला केला. मात्र कोणतेही नुकसान करण्याचा आमचा उद्देश नव्हता. केवळ आम्हीही बॉम्ब हल्ला करून काहीही करू शकतो आणि पाकिस्तानची ताकत आम्हाला दाखवायची होती, असे म्हणून ते पुढे म्हणाले, पाकिस्तान युद्धाच्या विरोधात असून शांती कायम राहिली पाहिजे, असे त्यांनी सांगितले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भारताने पाकिस्तानचे एफ – १६ विमान पाडल्याचा दावा गफूर यांनी अमान्य केला आहे. तर एफ – १६ विमानांचा वापर आम्ही केलाच नसल्याचे गफूर यांनी म्हंटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)