युपीमध्ये ‘बुआ-भतीजा’ आघाडीने ‘राहुल-प्रियंका’ला सोबत घेतलं तरी भाजपला हरवणं अश्यक्यच : शाह

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आज उत्तर प्रदेशातील बुआ-भतीजा आघाडीची खिल्ली उडवली आहे. अमित शाह यांनी बुआ-भतीजा म्हणजेच बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या आघाडीची थट्टा करताना म्हंटले की, “बुआ-भतीजा आणि दादा (आजोबा) एकत्र आले आहेत. तुम्हाला असं वाटत नाही का की अजित सिंग हे वयाच्या अशा टप्प्यावर पोहोचले आहेत की जिथे त्यांनी आजोबा अथवा पंजोबा बनायला हवं? त्यांना असं वाटत की ते उत्तरप्रदेशात भाजपचा पराभव करू शकतील मात्र त्यांनी राहुल बाबा आणि प्रियंका वढेरांना देखील बरोबर घेतलं तरी ते भाजपला पराजित करू शकणार नाहीत.”

दरम्यान, उत्तरप्रदेशमध्ये मायावती आणि अखिलेश यादव यांच्या आघाडीमध्ये लोक दलाचे अध्यक्ष अजित सिंग हे देखील सामील झाले असून अमित शहा आज लावलेला उपरोधिक टोला अजित सिंग यांच्याच वयावरून होता.

https://twitter.com/ANINewsUP/status/1112294401533841408

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)