बसपा-सपा आघाडी देशासाठी नव्हे अस्तित्वासाठीच : भारतीय जनता पक्षाने केली टीका

नवी दिल्ली: उत्तरप्रदेशात आज बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्ष यांनी निवडणूक आघाडी करण्याची घोषणा केली आहे त्यावर प्रतिक्रीया देताना भारतीय जनता पक्षाने म्हटले आहे की दोन पक्षांमध्ये झालेली ही आघाडी देशाच्या हितासाठी नव्हे तर स्वत:च्या राजकीय अस्तित्वासाठीची आघाडी आहे. या आघाडीचा लोकसभा निवडणुकीवर फार मोठा परिणाम होण्याची शक्‍यता नाहीं असेही भाजपने म्हटले आहे.

केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते रविशंकर प्रसाद यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले की आपण मोदींच्या विरोधात एकटे लढू शकत नाहीं याची खात्री पटल्यामुळेच ते एकत्र आले आहेत. केवळ मोदी विरोध या एकाच तत्वावर हे पक्ष एकत्र आले आहेत. निवडणूका या मॅथेमॅटिक्‍सवर नाही तर केमिस्ट्रीवर जिंकल्या जाऊ शकतात असे ते म्हणाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य म्हणाले की या दोन पक्षांमधील ही आघाडी म्हणजे भ्रष्टाचारी आणि गुंडांची आघाडी आहे. जनता एकसंधपणे मोदींच्या पाठीशी असून आम्ही सन 2014 पेक्षाही अधिक चांगली कामगीरी आगामी लोकसभा निवडणूकीत करून दाखवू असा विश्‍वासहीं त्यांनी व्यक्‍त केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)