‘बसपा’ आमदार जेडीएस-काँग्रेस सरकारमधून बाहेर; महायुतीच्या शक्यतांना आणखीन एक हादरा

संग्रहित छायाचित्र

मायावतींच्या काँग्रेसवरील हल्ल्यानंतर बसपाचा आमदार काँग्रेसच्या पाठिंब्याने सत्तेत असलेल्या सरकार मधून बाहेर पडत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

एन महेश (बसपाचे कर्नाटक येथील आमदार)

बँगलोर: बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती यांनी काही दिवसांपूर्वीच आपण ५ राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये काँग्रेसशी युती करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. यावेळी बोलताना मायावती यांनी काँग्रेसवर परखड शब्दांमध्ये ताशेरे देखील ओढले होते. याच पार्श्वभूमीवर आता जेडीएस-काँग्रेसचे आघाडी सरकार असलेल्या कर्नाटक मधील बसपाच्या आमदाराने आपल्या कॅबिनेट मंत्री पदाचा राजीनामा दिला आहे.

-Ads-

कर्नाटकातील एन महेश नामक या आमदाराने आपला राजीनामा सादर केला असून कुमारस्वामी यांच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीपासूनच जोर धरलेल्या महाआघाडीच्या चर्चांना कर्नाटकातच मोठा हादरा बसल्याचे चित्र आहे. याबाबत प्रसार माध्यमांशी बोलताना एन महेश यांनी आपण या निर्णयाबाबत मायावतींशी चर्चा न केल्याचे सांगितले असले तरी एवढा मोठा निर्णय पक्ष नेतृत्वाशी चर्चा केल्याशिवाय घेतला जाऊ शकतो का? असा प्रश्न निर्माण होतो.

मायावतींनी याआधी बोलताना ‘काँग्रेसला अतिआत्मविश्वास आला आहे.’ असे वक्तव्य केले होते. एन महेश यांचा राजीनामा काँग्रेसचे पाय पुन्हा जमिनीवर आणण्यासाठी मायावतींनीच खेळलेले कार्ड असू शकते अशा चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
6 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)