बसपाच्या माजी आमदाराची गोळ्या घालून हत्या 

बुलंद शहर (उत्तर प्रदेश): बसपाचे माजी आमदार आणि ज्येष्ठ नेते हाजी आलीम यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. हाजी आलीम यांचा मृतदेह बुधवारी त्यांच्या राहत्या घरी संशयास्पद स्थितीत सापडला. मेंदूतील रक्तस्रावाने हाजी अलीम यांचा मृत्यू झाला असल्याचे त्यांच्या कुटुुंबीयांचे म्हणणे आहे. त्यांच्या नाकाकानातून रक्तस्राव होत होता. मात्र त्यांच्या मस्तकात गोळी लागल्याचे पोलीसांनी सांगितले. त्यांच्या मृतदेहाजवळ पोलीसांना पिस्तूलही सापडले आहे. हाजी आलीम यांच्या मृत्यूबाबत शहरात उलटसुलट चर्चा होत आहेत.
हाजी आलीम हे बुलंदशहरातील सदर विधानसभा मतदार संघातून दोन वेळा विजयी झाले होते, सन 2017 च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला असला तरी त्यांना 90 हजारापेक्षा अधिक मते मिळाली होती. गरिबांना मदत करणारा नेता अशी त्यांची ओळख होती.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)