खटाव परिसरात बीएसएनएल सेवेचा फज्जा

खटाव – खटाव परिसरातील भारत संचार निगमचीची सेवा विस्कळीत झाली आहे. गेल्याच आठवड्यापूर्वी बी.एस.एन.एलने या परिसरात ‘थ्रीजी’ सेवा सुरू केली होती. त्यामुळे ग्राहकांच्यात समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते.

गेले दोन दिवस अचानक ही सेवा कोलमडली व ग्राहकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. येथील कार्यालयात चौकशी केली असता तांत्रिक बीघाडाचे कारण सांगीतले जात आहे. ऐन सणासुदीच्या काळात संपर्क यंत्रणा कोलमडल्यामुळे ग्राहकांतून संताप व्यक्त होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)