‘बीएसएनएल’मध्ये नोकरीची संधी

नवी दिल्ली : बीएसएनएलमध्ये मॅनेजमेंट ट्रेनी या पदासाठी भरती निघाली आहे. ही भरती एकूण 300 जागांसाठी असून, यामधील 150 जागा बाहेरील उमेदवारांची  निवड केली जाईल
या पदासाठी अर्ज प्रक्रिया 26 डिसेंबर 2018 पासून सुरू होणार असून, 26 जानेवारी 2019 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. इंजिनिअर पदवीधर या पदासाठी अर्ज करू शकतात.

पदाचे नाव – 
मॅनेजमेंट ट्रेनी (Telecom Operations)

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

एकूण पदांची संख्या –
300 पदे

शैक्षणिक पात्रता –
इंजिनिअरिंगमधील पदवीधर उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात.

वयाची अट – 
उमेदवाराचे वय हे 1 आॅगस्ट 2019 ला 30 वर्षांपेक्षा अधिक नसावे.

या आधारावर होणार निवड – 

उमेदवारांची आॅनलाईन परिक्षा घेतली जाईल व त्या नंतर गुणवत्ता यादी तयार केली जाईल. गुणवत्ता यादी नंतर उमेदवारांना मुलाखत आणि सामुहिक चर्चेला सामोरे जावे लागेल. त्यानंतर अतिंम गुवणत्ता यादीच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाईल.

वेतन – 
24,900 ते 50,500 महिना

या संकेतस्थळाद्वारे करू शकता अर्ज – 
अर्जाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर उमेदवार bsnl.co.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतो.

अर्जाविषयीच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

विविध क्षेत्रातील नोकरी संदर्भातील माहितीसाठी http://www.dainikprabhat.com/ वरील आमचा करिअरनामा हा पर्याय पाहू शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)