छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा स्फोटत बीएसएफचा जवान शहिद 

संग्रहित छायाचित्र.

रायपूर – छत्तीसगडमध्ये सोमवारी होणार असलेल्या विधानसभेच्या निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यापूर्वी आज नक्षलवाद्यांनी “आयईडी’चा स्फोट घडवून आणला. यामध्ये सीमा सुरक्षा दलाचा एक जवान शहिद झाला आहे. अन्य एका ठिकाणी झालेल्या चकमकीमध्ये एक माओवादीही मारला गेला आहे.

“बीएसएफ’च्या पथकाकडून कंकर जिल्ह्यातील नक्षलप्रभावित भागाची पहाणी केली जात असताना नक्षलवाद्यांनी पेरलेल्या “आयईडी’चा स्फोट झाला. त्यामध्ये “बीएसएफ’चे उपनिरीक्षक महेंद्र सिंह गंभीररित्या जखमी झाले. रुग्णालयात नेले जात असताना त्यांचा मृत्यू झाला असे रायपूर विभागाचे पोलिस महानिरीक्षक दिपांशू काब्रा यांनी सांगितले. स्फोट झालेल्या ठिकाणी लगेच अधिक कुमक पाठवून देण्यात आली असून नक्षलवाद्यांच्या शोधासाठी मोहिम सुरू करण्यात आली आहे.

-Ads-

गेल्या 15 दिवसात छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी “आयईडी’च्या सहाय्याने घडवून आणलेला हा चौथा स्फोट आहे.
एका अन्य घटनेमध्ये लष्करी गणवेशातील एका नक्षलवाद्याला सुरक्षा रक्षकांनी ठार केले. बिजापूर जिल्ह्यामध्ये ही चकमक झाली. बेद्रे येथील जंगलामध्ये स्पेशल टास्क फोर्सची नक्षलविरोधी मोहिम सुरू असताना ही चकमक झाली.

छत्तीसगडमध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणूकीवर नक्षलवाद्यांनी बहिष्काराचे आवाहन केले आहे. नक्षलवाद्यांकडून संभाव्य हिंसाचार घडण्याची शक्‍यता लक्षात घेऊन छत्तीसगडमध्ये सुमारे 1 लाख सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. उद्या होत असलेल्या पहिल्या टप्प्यातील मतदानाची पूर्वतयारी पूर्ण झाली असून निवडणूक पथके आपापल्या ठिकाणी रवाना झाली आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)