काश्‍मीर खोऱ्यात 14 वर्षांच्या खंडानंतर बीएसएफचे जवान तैनात 

file photo

श्रीनगर – काश्‍मीर खोऱ्यात तब्बल 14 वर्षांच्या खंडानंतर सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) जवान तैनात करण्यात आले आहेत. पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर त्या घडामोडीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

केंद्र सरकारने निमलष्करी दलांच्या 100 अतिरिक्त तुकड्या जम्मू-काश्‍मीरला धाडल्या. त्यामध्ये बीएसएफच्या 35 तुकड्यांचा समावेश आहे. याआधी काश्‍मीर खोऱ्यात अशांत स्थिती निर्माण झाल्यामुळे 2016 मध्ये बीएसएफची तात्पुरती तैनाती करण्यात आली होती. त्यावेळी आठवडाभरातच बीएसएफच्या तुकड्या मागे घेण्यात आल्या होत्या. दरम्यान, निवडणूकपूर्व पाऊल म्हणून निमलष्करी दलांच्या तुकड्या जम्मू-काश्‍मीरला पाठवण्यात आल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाने म्हटले. मात्र, पुलवामा हल्ला आणि विभाजनवाद्यांच्या विरोधात हाती घेण्यात आलेली मोहीम यापार्श्‍वभूमीवर निमलष्करी दलांच्या तैनातीचे महत्व वाढले आहे. बीएसएफबरोबरच केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) 45, भारत-तिबेट सीमा पोलीस दलाच्या (आयटीबीपी) 10 आणि एसएसबीच्या 10 तुकड्या जम्मू-काश्‍मीरला धाडण्यात आल्या आहेत. कायदा आणि सुव्यवस्था स्थिती अबाधित ठेवण्यासाठी ते पाऊल उचलण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)