“बीआरटी स्टॉप’ नादुरुस्त, असुरक्षित!

दरवाजे सताड उघडेच : पत्रव्यवहार करुनही दुरुस्ती नाही

पुणे – जलद आणि सुरक्षित पीएमपी बसेससाठी “बीआरटी’ सुरू करण्यात आली. मात्र, सुरूवातीपासूनच त्याच्या व्यवहार्यतेवर प्रश्‍न निर्माण झाले असताना आता त्यातील त्रुटी आणि अपुरे व्यवस्थापन समोर येत आहे. या बसस्टॉपचे दरवाजे नादुरुस्त असून प्रवाशांसाठी असुरक्षित ठरत आहेत.

-Ads-

“बीआरटी’ मार्गातील बसस्टॉपचे लाईट, डिस्प्ले बोर्ड सातत्याने बंद असणे, शिवाय अनेक बसस्टॉपवरील दरवाजा सताड उघडाच राहतो. यामुळे लहान मुले यातून डोकावतात. परिणामी, एखादी अप्रिय घटना घडण्याची भीती आहे. यासंदर्भात महापालिकेला पत्रव्यवहार करुनही दुरुस्ती केली जात नाही. सुरक्षेचा मुद्दा असूनही प्रशासन ही बाब गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप प्रवासी संघटनेने केला आहे.

पीएमपीएमएलच्या अध्यक्ष नयना गुंडे यांनी काही महिन्यांपूर्वी नगर रोड बीआरटी मार्गाची पाहणी केली. त्यात अनेक त्रुटी आढळून आल्या. त्यामध्ये स्थानकाचा दरवाजा न उघडणे किंवा दरवाजे कायमच उघडे राहणे अशा त्रुटी तातडीने दुरुस्त करण्याची सूचना गुंडे यांनी केली होती. तसेच, महापालिकेला लेखी कळविले होते. त्यानंतर किरकोळ दुरुस्ती करण्यात आली. पण, सध्या ही स्थिती जैसे थे आहे. याबाबत पत्रव्यवहार करूनही महापालिका प्रशासन दखल घेत नसल्याचा आरोप केला जात आहे.

नगर रोड “बीआरटी’ थांब्यावर पुरेशी आसनव्यवस्था नसल्याने पाऊस सुरू असताना समस्या उद्‌भवत आहेत. बस आल्यानंतर दरवाजे उघडणे अपेक्षित असताना काही ठिकाणचे दरवाजे उघडेच राहत आहेत. यासंदर्भात पीएमपी प्रशासनाकडे वारंवार तक्रार करुनही दखल घेतली जात नाही.
– संजय शितोळे, पीएमपी प्रवासी मंच.


नगर रोड “बीआरटी’ मार्गाबाबत महापालिकेशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. विशेषतः काही थांब्याचे दरवाजे उघडेच राहत असल्याचे कळवण्यात आले असून महापालिकेने ते दुरुस्त करुन देण्याची गरज आहे. याचा पाठपुरावा आमच्याकडून सुरू आहे.
– अजय चारठणकर, उपव्यवस्थापकीय संचालक, पीएमपी.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)