ब्रिटनने दहशतवाद्याच्या पत्नीचे नागरिकत्त्व केले रद्द 

लंडन (ब्रिटन) – ब्रिटनने मंगळवारी एका दहशतवाद्याच्या पत्नीचे ब्रिटिश नागरिकत्त्व रद्द केले आहे. बांगला देशी वंशाची ब्रिटिश युवती शामिमा बेगम ही फेब्रुवारी 2015 मध्ये इसिसला सामील होण्यासाठी आपल्या दोन मैत्रिणींसह सिरीयात पळून गेली होती. विद्यार्थिनी असलेल्या शमिमाने पालकांना न सांगता सिरीयात प्रवेश केला आणि 10 दिवसातच योगो रीडजिक या मुस्लिम जिहादी बनलेल्या डच नागरिकाशी विवाह केला होता. जिहादीशी विवाह करून लढा पुढे चालू ठेवण्यासाठी त्याची मुले उपजवण्यासाठीच तिने विवाह केला होता.

आता 19 वर्षाची असलेल्या आपल्याला केलेल्या कृत्याचा बिलकूल पश्‍चात्ताप होत नसल्याचे, आणि मोफत बालसंगोपनाचा लाभ घेण्यासाठी नवजात शिशूसह ब्रिटनमध्ये येण्याची इच्छा असल्याचे तिने स्पष्ट केले होते. सध्या ती सिरियन निर्वासित कॅंपमध्ये आहे. मात्र ब्रिटिश सरकारने तिचे ब्रिटिश नागरिकत्त्व रद्द केले असून तिला ब्रिटनमध्ये येण्यास बंदी केली आहे. यूकेचे गृहसचिव सजिद जाविद यांनी 19 तारखेला शमिमा बेगमच्या कुटुंबीयांना पत्र पाठवून तिचे ब्रिटिश नागरिकत्व रद्द केल्याचे कळवले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

1981 च्या ब्रिटिश नागरिकत्व कायद्यानुसार ब्रिटिश गृहसचिवाला सार्वजनिक हिताचे असल्यास एखाद्या नागरिकाचे नागरिकत्व रद्द करण्याचा अधिकार आहे. दहशवादाचे समर्थन करणाऱ्या, राष्ट्राचा द्वेष करणाऱ्या आणि सुरक्षेला धोका असलेल्या सुमारे 100 जणांचे ब्रिटिश नागरिकत्व रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)