बेल्जियममधील फिसेक-फायसेप स्पर्धेत चमकदार कामगिरी

बेल्जियममधील फिसेक-फायसेप स्पर्धेत चमकदार कामगिरी

पुणे: गेन्क (बेल्जियम) येथे पार पडलेल्या 70 व्या फिसेक-फायसेप गेम्स 2018 स्पर्धेत स्कूल स्पोर्टस फेडरेशन ऑफ इंडिया संघाचा जलतरणपटू सिद्धांत खोपडे याने उत्कृष्ट कामगिरी करताना दोन सुवर्ण, एक रौप्य, आणि एक कांस्यपदक पटकावले. या स्पर्धेत स्कूल स्पोर्टस फेडरेशन ऑफ इंडियाच्या फुटबॉल मुले), व्हॉलीबॉल (मुली) आणि स्विमिंग (मुले) संघानी सहभाग घेतला होता, अशी माहिती स्कूल स्पोर्टस फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव विठ्ठल शिरगावकर यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सिद्धांत खोपडे याने 50 मीटर बॅकस्ट्रोकमध्ये सुवर्ण, 100 मीटर बटरफ्लाय प्रकारात सुवर्णपदक, 200 मीटर बटरफ्लायमध्ये रौप्यपदक, आणि 100 मीटर बॅकस्ट्रोकमध्ये कांस्यपदक पटकावले. स्पर्धेत मुलींच्या व्हॉलीबॉल संघाने सहभाग घेतला होता. पुण्याच्या व्हॉलीबॉल चॅंपियन मिलेनियम स्कूलच्या खेळाडूंचा सहभाग असलेल्या स्कूल स्पोर्टस फेडरेशन ऑफ इंडिया संघाने बाद फेरीत स्पेनचा पराभव करत स्पर्धेत सहावे स्थान प्राप्त केले तर मुलांच्या फुटबॉल संघाला आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले.

एकूण 18 देशांचा सहभाग असलेल्या स्पर्धेचे आयोजन फ्लेमिश स्कूल स्पोर्टस असोसिएशनच्या वतीने फेडरेशन दी इंटरनेशनल कॅथलिक स्कूल स्पोर्टसया (फिसेक) अधिपत्याखाली करण्यात आले होते. फिसेक ही इंटरनॅशनल ऑलिंपिक समितीअंतर्गत मान्यताप्राप्त संघटना आहे. विठ्ठल शिरगावकर म्हणाले की, फिसेक गेम्स हे शालेय खेळाडूंसाठी ऑलिम्पिक खेळाच्या तयारीसाठी उत्तम व्यासपीठ असून, येथे आंतरराष्ट्रीय खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळते. याचा उपयोग विद्यार्थ्यांना भविष्यातील स्पर्धेच्या दृष्टीने होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)