पाकिस्तानी माफियांकडून लाचखोरी, धमक्‍या आणि दडपशाही

पंतप्रधान इम्रान खान यांचा आरोप

इस्लामाबाद – पाकिस्तानमधील माफियांकडून सरकारी यंत्रणेवर आणि न्याय पालिकेवर लाचखोरी, धमक्‍या, ब्लॅकमेलिंग आणि दडपशाही आणली जात आहे. परदेशात लपवून ठेवलेली अब्जावधी रुपयांची मालमत्ता वाचवण्यासाठीच हा दबाव आणला जात आहे, असा आरोप पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केला आहे. माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या खटल्याशी संबंधित पाकिस्तान मुस्लिम लीग- नवाझ गटाच्या नेत्या मरियम यांचा व्हिडीओ उघड झाल्यानंतर खान यांनी हा आरोप केला आहे.

शरीफ यांना कोणत्याही पुराव्याशिवाय दोषी ठरवण्यात आल्याचे उत्तरदायित्व न्यायालयाचे न्यायाधीश अर्शद मलिक यांनी कबूल केले असल्याचे मरियम यांनी या व्हिडीओमध्ये म्हटल्याचे दिसत आहे. शरीफ सध्या लाहोरमधील कोट लखपत कारागृहामध्ये 7 वर्षांची शिक्षा भोगत आहेत. सौदी अरेबियातील स्टील मिलची मालकी मिळवण्यसाठीच्या उत्पन्नाचे स्रोत सिद्ध न करता आल्यामुळे शरीफ यांना गेल्या वर्षी दोषी ठरवून शिक्षा सुनावण्यात आली होती.

मरियम यांनी केलेला दावा न्या. मलिक यांनी फेटाळून लावला आहे. आपण आणि न्यायपलिकेला बदनाम करण्याचा हा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. मात्र या व्हिडीओबाबत पुरेसे स्पष्टिकरण देऊ न शकल्याने न्या. मलिक यांचे अधिकार काढून घेण्यात यावेत, अशी सूचना शुक्रवारी इस्लामाबाद उच्च न्यायालयाने कायदा मंत्रालयाला पत्र लिहून केली आहे.

आपल्याला ब्लॅकमेल केले जात असून शरीफ कुटुंबीयांकडून मोठी लाच देण्याच प्रस्तव्ही असल्याचा आरोप न्या. मलिक यांनी एका प्रतिज्ञापत्राद्वारे केला आहे. अशाच प्रकारे न्यायपालिकेला धमकावणे, ब्लॅकमेल आणि दडपण आणले जात असल्याचे इम्रान खान यांनी म्हटले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)