कोपा अमेरिकन फुटबॉल स्पर्धेत ब्राझीलला विजेतेपद

रिओडीजानिरो – घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा घेत ब्राझीलने कोपा अमेरिकन फुटबॉल स्पर्धेत अजिंक्‍यपद पटकाविले. त्यांनी उत्कंठापूर्ण लढतीत पेरू संघाचा 3-1 असा पराभव केला.

सामन्याच्या 13 व्या मिनिटाला एव्हरटन याने ब्राझीलचे खाते उघडले. 44 व्या मिनिटाला पेरू संघाच्या पाओलो गुरेरो याने पेनल्टीकिकचा लाभ घेत गोल केला व 1-1 अशी बरोबरी साधली. मध्यंतरापूर्वीच्या भरपाई वेळेत ब्राझील संघाच्या गॅब्रियल जेसुसने गोल करीत पुन्हा आपल्या संघास 2-1 असे आघाडीवर नेले. या गोलच्या आधारे ब्राझीलने आघाडी टिकविली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सामन्याच्या 90 व्या मिनिटाला ब्राझील संघास पेनल्टीकिकची सधी मिळाली. त्याचा फायदा घेत रिचर्लीसन याने गोल केला व संघास 3-1 अशी आघाडी मिळवून दिली. याच आघाडीवर त्यांनी सामना जिंकला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)