ब्राझिलही जेरूसलेमला दूतावास हलवणार 

रिओ द जानेरियो – इस्त्रायलचा जेरूसलेम शहरावरील हक्क अधोरेखीत करण्यासाठी अमेरिकेने काही दिवसांपुर्वी जेरूसलेमला इस्त्रायलच्या राजधानीचा दर्जा दिला आहे. त्यांच्या या कृतीने आखाती देशात मोठीच खळबळ माजली होती पण त्यांची फिकीर न करीत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला निर्धार कायम ठेवीत इस्त्रायल मधील अमेरिकन दुतावास जेरूसलेमला हलवला. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत आज आपणही तेलअव्हीव मधील दूतावास जेरूसलेमला हलवणार आहोत अशी महत्वपुर्ण घोषणा ब्राझील या देशाने केली आहे.

ब्राझिलचे अध्यक्ष जैर बोलसोनारो यांनी स्वता ही माहिती दिली. आपण ब्राझील मध्ये सत्तेवर आलो तर तेलअव्हीव मधील आपला दूतावास आपण जेरूसलेमला हलवू अशी घोषणा आपण निवडणूक प्रचार काळातच केली होती त्या आश्‍वासनाची पुर्तता करण्याचा निर्णय आपण घेत आहोत अशी घोषणा बोलसोनारो यांनी केली आहे. इस्त्रायल हा सार्वभौम देश आहे आणि त्यांचा आपण सन्मान केला पाहिजे असेही त्यांनी म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आपल्या देशाची राजधानी कोठे हवी हे ठरवण्याचा इस्त्रायलला अधिकार आहे. त्यामुळे आम्ही त्यांना या विषयावर पुर्ण पाठिंबा द्यायचे ठरवले आहे असे त्यांनी म्हटले आहे. पॅलेस्टाईननेही जेरूसलेमवर आपलाच दावा सांगितला आहे. ते शहर आमचीच राजधानी असेल त्यांनी म्हटले आहे. पण त्यांचा विरोध डावलून इस्त्रायलने या शहरावर पुर्ण कब्जा केला आहे. त्यांच्या या कृत्याला आधी अमेरिका आणि आता ब्राझीलने पाठिंबा दर्शवल्याने त्याची इस्लामिक देशात मोठी प्रतिक्रीया उमटण्याची शक्‍यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)